`म्हाडा` ट्वीट बॅाम्ब... महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश!

म्हाडाच्या सदनिका हस्तांतरणावर विधान परिषदेतील हॅाट चर्चेत महापालिका आयुक्तांवर ताशेरे.
Commissioner Kailas Jadhav
Commissioner Kailas JadhavSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला (MHADA) वर्ग करण्याचा नियम आहे. महापालिकेने (NMC) त्याचे उल्लंघन केले. यासंदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली. त्याची विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Minbalkar) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश दिले. या निर्णयाने महापालिकेत अक्षरशः भुकंप आल्याचे चित्र आज पहायला मिळाले. (Government oreder probe NMc & Transfer commissionar Kailas Jadhav)

Commissioner Kailas Jadhav
माझे जीवन सापसिडीच्या खेळासारखे, लिहीले तर चार हजार पानांचे पुस्तक होईल!

म्हाडाच्या नियमानुसार चार हजार चौरस मिटरहून अधिक क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्पातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल व अन्य घटकांसाठी म्हाडाकडे वर्ग करण्याचा नियम आहे. मात्र नाशिक महापालिकेत त्याचे उल्लंघन झाले आहे. याबाबत आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर गंभीर चर्चा झाली. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आव्हाड यांनी चौकशीचे आश्‍वासन दिले. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली.

Commissioner Kailas Jadhav
भुजबळ, भरणे एकत्र आल्याने `ओबीसी`चा नवा राजकीय संदेश?

दरम्यान सभापती निंबाळकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत संबंधितांवर चौकशी अंती कारवाई करण्याबरोबरचं अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीच्या सुचना दिल्या. गेल्या आठ वर्षात महापालिकेने दहा घरे देखील हस्तांतरीत न केल्याने बांधकाम व्यावसायिकांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला. श्री. दरेकर यांनी या विषयावर लक्षवेधी मांडली होती.

गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. नोव्हेंबर २०१३ च्या नियमानुसार विकास नियंत्रण नियमावली तसेच डिसेंबर २०२० पासून लागु करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका उपलब्ध होण्यासाठी नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार वीस टक्के प्लॉट किंवा सदनिका बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे (म्हाडा) हस्तांतरीत करावे लागतात. परंतू नाशिक महापालिकेने दहा घरे सुध्दा महापालिकेकडे हस्तांतरीत न करता विकासकांना बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला. हा मोठा गुन्हा आहे. त्यात सातशे ते एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले.

काही दिवसांपुर्वी श्री. आव्हाड यांनी तसे ट्वीट केले होते. मुंबई, ठाणे, पुणे शहरांमध्ये म्हाडाने मोठ्या प्रमाणात लॉटरी काढली असताना नाशिकमध्ये म्हाडाकडे घरे हस्तांतरीत झाली नसल्याने संशय वाढला. त्यातून साडे तीन हजार घरे हस्तांतरीत न होता परस्पर विक्री झाल्याचा संशय बळावला. सन २०१३ ते २०२१ पर्यंत म्हाडाने महापालिकेकडे २२ वेळा पत्रव्यवहार केला परंतू एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली परंतू त्यानंतरही माहिती देण्यात टाळाटाळ झाली.

म्हाडाला ज्या जमिनी दिल्या त्या नासर्डी पुल किंवा संरक्षण विभागाच्या जागेला लगत जेणे करून तेथे ईमारत बांधणे अशक्य आहे. यात सातशे ते एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने म्हाडाकडे हस्तांतरीत झालेल्या घरांची माहिती घेतली व लक्षवेधीला उत्तर देताना माहिती सादर केली. महापालिकेने घोटाळा झाला नसल्याचा पुन्हा लेखी पुर्नरुच्चार केला होता.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com