भुजबळ, भरणे एकत्र आल्याने `ओबीसी`चा नवा राजकीय संदेश?

सकल धनगर समाजातर्फे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार
Chhagan Bhujbal & Dattatray Bharne, OBC Politics News, OBC Reservation News, Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal & Dattatray Bharne, OBC Politics News, OBC Reservation News, Chhagan Bhujbal News Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा व पुरस्काराच्या निमित्ताने `ओबीसी` (OBC) समाजाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व दत्तात्रय भरणे (Dattatray Bahrne) हे दोन नेते एकत्र आले. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात ओबीसींच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांचा संदेश राज्याच्या राजकारणात काय परिणाम घडवतो याची सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. (OBC Politics News updates)

Chhagan Bhujbal & Dattatray Bharne, OBC Politics News, OBC Reservation News, Chhagan Bhujbal News
भुजबळांची भरणेंना साद, तुमचा आमचा एक आवाज!

पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री. भुजबळ यांच्या हस्ते श्री. भरणे यांचा नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमात मंत्री भुजबळ यांनी धनगर समाजाचे योगदान व आरक्षणाचा प्रश्न यासाठी भविष्यात संयुक्त लढा देण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तेव्हढाच प्रतिसाद दिला. त्यामुळे ओबीसी राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला बळ देणारे हे पाऊल ठरते का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Chhagan Bhujbal & Dattatray Bharne, OBC Politics News, OBC Reservation News, Chhagan Bhujbal News
विनयभंगाचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण...

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांची सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडविण्यात येतील. शरद पवार यांच्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले त्यामुळे समाजाला अधिक फायदा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवडचा रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून दिला जाईल असे त्यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबईचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, ह. भ. प. तुकाराम महाराज जेऊरकर, साहित्यिक तथा उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी, उपजिल्हाधिकारी रोहन कुंवर, नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र दुकळे, नगरसेविका पूनमताई मोगरे, प्रगतीशील शेतकरी दत्तू देवकर, उद्योजक बाळासाहेब मुरडनर, डॉ. विजय थोरात, पत्रकार धनंजय वानले, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय गाढे यांना हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर पुरस्कार देण्यात आला.

यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, आमदार हरिभाऊ भदे, शिवाजीराव ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार धंनजय तांदले यांनी प्रास्ताविक केले. कवी प्रा. विष्णू थोरे यांनी सुत्रसंचालन केले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com