येवला : राष्ट्र सेवा दल (Rashtra seva Dal) या संघटनेतर्फे कन्याकुमारी ते काश्मीर अशी राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) जोरदार समर्थन देण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शंभरावर कार्यकर्ते जमा झाले आणि तब्बल दोन तास भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ राष्ट्र सेवा दल दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन आणि गाणी गाऊन परिसर दणाणून सोडला. (Rashtra seva dal followers sung a song in support of Bharat Jodo Yatra)
प्रारंभी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या सुधा पाटील,प्रमिला दाणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यामध्ये छोट्या शाखेतील बालसैनिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नफरत छोडे, भारत जोडो यात्रेला विविध स्तरावर प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी शहरात पदयात्रा व जनजागरण करण्यात आले. विविध संघटनांनी त्याला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी शेगाव येथे यात्रेत सहभागी झाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होत आहेत.
जोडो जोडो, भारत जोडो, धर्म भेद छोडो! प्रांत भेद छोडो छोडो! जातीभेद छोडो छोडो! लिंगभेद छोडो छोडो! विषमता तोडो तोडो, नफरत छोडो भारत जोडो,इन्कलाब झिंदाबाद! सेवा दल बढाना है,परिवर्तन लाना हैं. या घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील प्रांगण दणाणून सोडले. यावेळी सामाजिक परिवर्तन मागणारी गाणी तरुणांनी गायली.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, जिल्हा राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे, प्रा. डॉ. अजय विभांडिक, काँग्रेस युवा नेते नानासाहेब शिंदे, तालुका राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बारे, अजहर शहा, कानीफ मढवई, रमेश पवार, अप्पासाहेब शिंदे, गणेश जाधव, उत्तम बंड, शिवाजी साताळकर, बाबासाहेब गोविंद, बाबासाहेब कोकाटे, हेमंत पाटील, खुशाल गायकवाड, सलिल पाटील, रावसाहेब खराटे आदी उपस्थित होते. या वेळी मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयावर भरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेचे सैनिक व तरुण यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.