RSP News : भाजपमध्ये जुन्या नेत्यांना कोणी विचारण,आम्हाला कोण विचारणार! 'रासप'ने केली भुमिका स्पष्ट

Maharashtra politics : राज्यात आलेले सरकार ही अभद्र युती असल्याचा बोचरी टिका
RSP Meeting
RSP Meetingsarkarnama
Published on
Updated on

Nagar : सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यात कोणासोबत युती आघाडी करायचे याचे निर्णय देखील झाले आहेत. मात्र, भाजपसोबत युती करण्यास राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. भाजपमध्ये जुन्यांनाच कोणी विचारत नाही. तर आम्हाला कोण विचारणार, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी भाजपवर टीका केली. तसेच लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय देखील कुमार सुशील यांनी जाहीर केला.

RSP Meeting
Satej Patil On Bhujbal : भुजबळांचा बोलविता धनी कोण हे राज्याला माहीत, त्यांचे वक्तव्य म्हणजे...; सतेज पाटलांनी डागली तोफ

राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे नगर लोकसभा प्रमुख रवींद्र कोठारी, जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, महिला जिल्हाध्यक्ष मंदाकिनी बडेकर, शहराध्यक्ष चिमाजी खामकर,रमेश व्हरकटे, भानुदास हाके(मेजर), रमजान शेख, प्रल्हाद पाटील आदि यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागलेल्या आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित बैठक घेतली. भाजपमध्ये आज जुन्यांना कुणी विचारत नाही ही परिस्थिती आहे. एखादा पक्ष मोठा झाल्यावर तो वरती जातो, त्यावेळेला तो दुसऱ्याला वरती येऊ देत नाही, अशी अवस्था झाली आहे. भाजपबरोबर अनेक मित्र पक्ष नाहीत.",असेकुमार सुशील म्हणाले.

राज्यात अभद्र युती

आमचा पक्ष हा या सर्वांच्या विरोधामध्ये लढणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जेव्हा नेतृत्व करत होते. त्यावेळेला त्यांचे विचार व त्यांची शिकवण ही महादेव जानकर यांनी घेतली. महाराष्ट्रमध्ये सध्या अभद्र युती आहे. कोण कोणाच्या पक्षाची हात मिळवणी करेल हे काही सांगता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वबळावर 48 जागा लढवणार असल्याचेही कुमार सुशील यांनी सांगितले.

ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. गरीब मराठ्याला आरक्षण मिळावे, अशी भूमिका महादेव जानकर यांनी या आधीच मांडलेली आहे. आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा, नये अशी भूमिका आमची असल्याचे कुमार सुशील यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com