Satej Patil On Bhujbal : भुजबळांचा बोलविता धनी कोण हे राज्याला माहीत, त्यांचे वक्तव्य म्हणजे...; सतेज पाटलांनी डागली तोफ

Kolhapur Politics : " मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे..."
Kolhapur  Politics News
Kolhapur Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादाचा भडका उडाला आहे. यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील आरोप- प्रत्यारोपांमुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढतच राहिला आहे. आता भुजबळांचे बोलविते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळले आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचा हा सरकारचे षडयंत्र आहे. सरकारमधील एका मंत्र्यांचे असे वक्तव्य अजून देखील थांबत नाही. म्हणजे हे सरकारचे वक्तव्य आहे असे समजायचे का? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत आहे. 24 तारखेला कोर्टात टिकेल, असे मराठा आरक्षण देतो असे सरकार म्हणाले होते. मराठा समाज आतुरतेने वाट बघत होता. मात्र सरकारने त्यांची फसवणूक का केली. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतो म्हणत आहेत. मात्र त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही.

Kolhapur  Politics News
Praniti Shinde : "सत्तेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलंही कांड करतील..."

अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झालं. यामुळे मराठा समाजाची ही फसवणूकच झाली आहे. गेल्या वेळेस एक मार्चला आचारसंहिता लागली होती. यंदा देखील 5 मार्चपर्यंत आचारसंहिता लागेल असे वातावरण आहे.मग सरकारने 24 तारीख का दिली? अनेक तरुण-तरुणी या तारखेच्या आशेवर होते. मात्र, सर्वांची फसवणूक झाली असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. (Maratha Reservation)

खासदार निलंबनावरून बोलताना, देश हुकूमशाहीकडे चालल आहे. विरोधी खासदार नसताना तीन कायदे पास करण्यात आले. या तीन कायद्याकडे बारकाईने लक्ष दिले, तर खासदार निलंबित का केले? याचे कारण लक्षात येईल.विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते. भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो म्हणून हा कायदा पास करण्यासाठी खासदारांना निलंबित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तरुण अशा पद्धतीने संसदेत घुसतो. त्यावरून सुरक्षा आणि यास अनेक प्रश्नांवर चर्चा होणे खासदारांची अपेक्षा होती. मात्र सरकार रोज नवीन एक इतिहास करत आहे. खासदार निलंबित करून देखील एक नवीन इतिहास त्यांनी केला. अशा शब्दात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी समाचार घेतला.

भाजपाला(BJP) मत विभागणीचा फायदा होत आहे. मात्र, इंडिया आघाडी एकत्रित सक्षमपणे पुढे जाईल. राज्यस्तरावरील राजकारण वेगळा असते.मात्र देशातील आता नागरिकांना कळून चुकला आहे की महागाई बेरोजगारी याची झळ आता लोकांना बसू लागले आहे. केवळ प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार केवळ पुढे आहे, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Kolhapur  Politics News
IPS Officers Transfers : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे शहरला मिळाले सहायक पोलिस आयुक्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com