Raver Lok Sabha Constituency 2024: रावेरमध्ये 'खडसे'वर विश्वासाची हॅटट्रिक...

Lok Sabha Election Results Live: एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची सहानुभूती त्यांच्या मागे होती. रक्षा खडसे यांनी भाजपची ईमानदारपणे दिलेली साथ यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली.
Raver Lok Sabha Constituency 2024
Raver Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Raver News: रावेर लोकसभा मतदार संघात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या सून भाजप उमेदवार रक्षा खडसे एक लाख मतांनी आघाडीवरवर आहेत. खडसे यांच्यावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांच्या विषयी सहानुभूती व रक्षा खडसे यांनी केलेल्या कामावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे.

रावेर लोकसभा मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना यावेळी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत चर्चा होती. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.परंतु रक्षा खडसे यांचा मतदार संघात (Raver Lok Sabha Constituency 2024) दांडगा संपर्क तसेच त्यांनी केलेली कामे या बळावर पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.

यानंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे एकदम वातावरण बदलले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची सहानुभूती त्यांच्या मागे होती. रक्षा खडसे यांनी भाजपची ईमानदारपणे दिलेली साथ यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील उभे होते. त्यांना मराठा व मुस्लिम मते मिळून ते विजयी होतील अशी अपेक्षा होती.मात्र सर्व समाज 'खडसे' यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे दिसत आहे. आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदान यंत्रात दोष असल्याचा आक्षेप घेतला. रावेर मतदारसंघाची मतमोजणी थांबविण्यात आली होती.

निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

रावेर लोकसभा मतदारसंधात जळगावचे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व भुसावळला संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत. चोपड्याला लता सोनवणे (शिंदेगट), रावेरला शिरीष चौधरी (काँग्रेस) मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील (अपक्ष, शिंदे गटाला समर्थन) असे आमदार आहेत.

Raver Lok Sabha Constituency 2024
Maval Loksabha Election 2024 Result: मावळात दोन्ही शिवसेनेत काट्याची टक्कर, शिंदे गट पडतोय ठाकरेंवर भारी

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे (भाजप) ६५५३८६ मते घेऊन विजयी झाल्या होत्या तर त्यांचे विरोधक डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस) यांना ३१९५०४ इतकी मते मिळाली होती. २००४ पासून २०१९ पर्यंत सर्व लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे वर्चस्व राहिले आहे.

रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. एकनाथ खडसेंमुळे रक्षा यांच्या उमेदवारीबद्दल भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचे निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com