Ajit Pawar News : एकनाथ खडसे, गिरीश महाजनांच्या नावांनंतर 'रावेर'वर आता अजितदादा गटाचा दावा

Raver Lok Sabha Constituency : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.
Raver Lok Sabha constituency News
Raver Lok Sabha constituency News Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Latest News : भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेल्या आणि पक्षातर्फे उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच आता या मतदारसंघात मित्र पक्ष अजित पवार गटाने आपला दावा केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या मतदारसंघात आमच्याकडे हमखास निवडून येणारा सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. या मतदारसंघाच्या खासदार भाजपच्या रक्षा खडसे आहेत. त्या दोनदा या मतदारसंघातून निवडून आल्या असून, तिसऱ्यांदा त्या लढण्याची तयारी करीत आहेत. मात्र, या वेळी त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.

Raver Lok Sabha constituency News
Lalit Patil Arrest : ललितच्या अटकेनंतर आईवडिलांना अश्रू अनावर; म्हणाले, 'पोलिसांनी आम्हाला त्रास देऊ नये, कारवाई योग्यच!

अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव

या मतदार संघातून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यातच आता राज्यात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, आमच्याकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार आहे, त्या बळावरच आम्ही दावा करीत आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला आहे. ते जागावाटपात त्याबाबत चर्चा करतील, त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल.

दोन मोठे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार

आम्ही आमचा पक्ष बळकट करीत आहोत. अजित पवार लवकरच जिल्ह्यात सभा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचा व काँग्रेस पक्षाचा एक असे दोन मोठे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. त्याच बळावर आम्ही जिल्ह्यात एका लोकसभा मतदारसंघाचा दावा करीत आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

Raver Lok Sabha constituency News
Nitin Gadkari News : कोसळलेल्या उड्डाण पुलाला नितीन गडकरींचे नाव! मनसेची खोचक बॅनरबाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com