Nashik News : ससून रुग्णालयातून ड्रगमाफिया ललित पाटीलला साकीनाका पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. तो श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. गेल्या सोळा दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. यापूर्वी ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे या दोघांना पोलिसांनी नेपाळजवळ अटक केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ललितच्या अटकेनंतर त्याची आई भाग्यश्री पाटील यांनी "उतारवयात पोलिसांनी आम्हाला त्रास देऊ नये, पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे," असे सांगितले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
"पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, आम्ही लक्ष देऊनही त्याचा उपयोग झाला नाही,," असे ललितच्या आई भाग्यश्री पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. "माझी मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत, हे मला बातम्यांमधून कळाले. हे समजल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला आहे ," असे त्या म्हणाल्या.
ललितला मुंबई गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली आहे. त्याला साकीनाका पोलिस ठाण्यात आणले आहे. आज दुपारी मुंबई पोलिस आयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. सोळा दिवसांपासून फरार असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. ललित पाटील दोन ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता.
ललित आधी एका वाईन कंपनीत कामाला होता. नंतर त्याने परदेशात शेळी विक्रीचा व्यवसाय तीन ते चार वर्षे केला. ललित आणि भूषण हे अमली पदार्थ तस्करीत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या वडिलांना धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
"पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली असून, त्यात पेनड्राइव्ह सापडले आहेत. आमचे मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. अनेक वर्षांपासून ललित, भूषण आमच्या संपर्कात नाहीत," असे भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.