Raver Lok Sabha exit polls news today: रक्षा खडसे हॅटट्रिक साधणार; रावेरमध्ये ‘खडसे’नावामुळे तिसऱ्यांदा संधी

lok sabha election 2024 exit polls:ज्या नावामुळे त्यांना दोन वेळा संधी मिळाली त्याच ‘खडसे’नावामुळे तिसऱ्यांदा भाजप त्यांची संधी नाकारणार काय? याबाबत चर्चा होती, आजच्या पोलनुसार रक्षा खडसेंच्या मतदारांनी कौल दिल्याचे दिसते.
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama

उत्तर महाराष्ट्रात रावेर लोकसभा मतदारसंघ हा निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना भाजपकडून पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरले आहे.. त्या हॅटट्रिक साधणार असल्याचे दिसते.

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, तर भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे पुन्हा कमळ फुलवण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसते. रक्षा खडसेच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील (Shriram Patil) यांनी जोरदार प्रचार करुन खडसेसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

रक्षा खडसे यांची जनतेशी नाळ चांगली आहे. त्यांनी मतदारसंघात विकास कामे केली आहेत. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे यांनी भाजपचे काम कट्टरतेने केले.

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Exit Poll 2024 : महाजनांची कमाल, स्मिता वाघांची धमाल?

पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे कोणतेही पक्षातर्गंत वाद दिसून आलेले नाहीत. मात्र ज्या नावामुळे त्यांना दोन वेळा संधी मिळाली त्याच ‘खडसे’नावामुळे तिसऱ्यांदा भाजप त्यांची संधी नाकारणार काय? याबाबत चर्चा होती, आजच्या पोलनुसार रक्षा खडसेंच्या मतदारांनी कौल दिल्याचे दिसते.

ऐन निवडणुकीच्या धामधुमात एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली, एकनाथ खडसेंनीही त्याला दुजोरा दिला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे हे थेट प्रचारात उतरले नसले तरी त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार केला, हे उघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com