Smita Wagh V/S Karan Pawar : जळगाव लोकसभा मतदारसंघात संघात टीव्ही 9 च्या अंदाजानुसार भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर दिसत आहे. महायुतीच्या एकत्रित काम करण्याचा हा परिणाम दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक यांनी संभाळलेली कमान यशस्वी ठरली.
भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघविरुद्ध शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी आपले मित्र परोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली.
भाजपने माजी आमदार स्मिता वाघ (BJP) यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक अटीतटीची झाली. या मतदारसंघात खऱ्या अर्थाने माहविकास आघाडीविरुद्ध महायुती, अशी लढत झाली. दोन्ही गटाच्या मित्र पक्षांनी आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी जोमाने काम केले. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील यांनी आपापल्या मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विजयासाठी जोर लावला तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील या अजित पवार गटाच्या मंत्र्यांनीही आपल्या अमळनेर मतदारसंघात जोर लावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी तर प्रचाराचे नेतृत्व केले,तर अमळनेर येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवार विजयासाठी आपली संपूर्ण ताकत झोकून दिली होती. खऱ्या अर्थाने मंगेश चव्हाण यांच्या राजकीय अस्तिवाचा प्रश्न निर्माण झाला होता. जळगाव शहरात भाजप आमदार सुरेश भोळे यांनी ताकद लावली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी पक्षाचा राजीनामा देवून भाजपच्या स्मिता वाघ यांना पाठिंबा दिला. या शिवाय भाजपचे मजबूत बूथ यंत्रणेमुळे भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची आघडी दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.