Nashik News; शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या ताफ्यात शेकडो वाहने कोणाची?

सामान्यांना पेट्रोल परवडेना, हे मात्र शेकडो वाहनांसह दाखल
Fleet Of Shivsena rebel Corporators
Fleet Of Shivsena rebel CorporatorsSarkarnama

नाशिक : राज्यातील (Maharashtra) सत्तांतरानंतर नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या प्रमाणात यश मिळालेल्या शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी शहरात आगमन करताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. पाथर्डी फाटा येथून भव्य रॅली काढताना शिवसेनेला (Shivsena) जणू आव्हानच दिले. जवळपास १३ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिंदे गटासाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. (Rebel ex corporators trying to giving challange for shivsena)

Fleet Of Shivsena rebel Corporators
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

शिवसेनेचे जे नगरसेवक शिंदे गटात गेले, त्या प्रत्येकाची आपल्या प्रभागात स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्या जाण्याने फरक पडत नसल्याचे वक्तव्य केले जात आहे. त्यात किती तत्थ्य आहे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सामान्यांना पेट्रोल परवडत नाही, इंधन दरवाढीने ते त्रस्त असताना या नगरसेवकांचे आगमण शेकडो वाहनांसह झाल्याने नाशिकच्या नागरिकांत मात्र मनोमन संताप निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Fleet Of Shivsena rebel Corporators
Chhagan Bhujbal News; राज्यात आणीबाणी लागू केली आहे काय?

या माजी नगरसेवकांची निवडून येण्याची क्षमता असल्याच दावा त्यांचे समर्थक करतात. त्यामुळे हे तेरा माजी नगरसेवक शिवसेनेच्या सध्याच्या अस्तित्वातील नगरसेवकांच्या संख्येत वजावट होणार आहे.

दोन ते चार वेळा निवडून आलेल्या या माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळाही दणकेबाज झाल्यानंतर शहरातील आगमनही त्याच थाटात करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचा जवळपास दोनशे वाहनांचा ताफा पाथर्डी फाटा येथे आल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

कसारा घाट ओलांडल्यानंतर घाटनदेवी येथे पूजन करण्यात आले. या वेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यातर्फे प्रवेशकर्त्या नगरसेवकांचे भव्य स्वागत करण्यात आले. वाडीवऱ्हे येथे स्वागत झाल्यानंतर नाशिक शहरात आगमन झाल्यावर पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

रॅलीद्वारे शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिल्हा न्यायालयासमोरील शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीची सांगता झाली. रॅलीत २०० वाहनांसह हजारहून कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

अजय बोरस्ते, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, रमेश धोंगडे, प्रताप मेहरोलिया, राजू लवटे, सूर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, सुदाम ढेमसे, चंद्रकांत खाडे, सचिन भोसले यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आदी या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com