NMC electionnews; शिंदे गट नाशिकचा नव्हे, वैयक्तिक विकासाचे मॉडेल

शिंदे गटात प्रवेशामागे माजी नगरसेवकांचे वैयक्तिक विकासाचे मॉडेल
Rebel Corporators with CM Eknath Shinde
Rebel Corporators with CM Eknath ShindeSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माध्यमातून नाशिक (Nashik) शहराचा विकास होण्याचा दावा करताना त्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचे (NMC) म्हणणे आहे. असे असले तरी प्रत्यक्षात प्रवेशकर्त्यांनी वैयक्तिक विकासाचे मॉडेल विकसित करण्यासाठीच प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात घेतलेल्या आढाव्यातून ही बाब स्पष्ट होत आहे. (Ex corporators are concentrating more of individual issues & devolopment)

Rebel Corporators with CM Eknath Shinde
Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

बोरस्ते यांना राहायचे कायम ‘अजय’

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचे नेतृत्व केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे १५ नगरसेवक निवडून आले तरी उपमहापौर, विरोधी पक्षनेते किंवा स्थायी समिती सभापती पदावर दावा सांगता येणार आहे. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास महापौर पदावरदेखील शिंदे गटाचा दावा होऊ शकतो. एका अर्थाने महापालिकेवर शिंदे गटाची पकड निर्माण करण्यासाठी बोरस्ते यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात बोरस्ते यांना महापालिकेवर पकड हवी आहे.

Rebel Corporators with CM Eknath Shinde
Chhagan Bhujbal News; राज्यात आणीबाणी लागू केली आहे काय?

भोसले कुटुंबात फूट

शिवसेना व मनसे असा प्रवास केलेल्या भोसले कुटुंबात सचिन भोसले यांच्या निमित्ताने फूट पडली आहे. सचिन यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याने माजी आमदार नितीन भोसले काय भूमिका घेता, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सचिन भोसले यांचा पिंड ठेकेदारीचा आहे. जिथे सत्ता असते, तेथे मोठ्या प्रमाणात कामे मिळण्याची संधी असते. त्यामुळे सचिन भोसले यांना ही संधी वाया जाऊ द्यायची नसल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

मटालेंचे राजकीय भवितव्य सुवर्ण

सिडको विभागातून एकदा मनसे व दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुवर्ण मटाले यांना तिसऱ्यांदा निवडून यायचे आहे. महापालिकेच्या सत्तेतील तिसरी एन्ट्री त्यांना भविष्यातील विधानसभेचा मार्ग मोकळा करून देणारी ठरेल. मटाले या शिवसेनेतच राहिल्या असत्या, तर

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा अडथळा ठरला असता. त्यामुळे शिंदे गटाचा मार्ग त्यांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. भविष्यात शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तरी आमदारकीसाठी त्यांची दावेदारी होऊ शकते.

नाशिक रोडला स्वयंघोषित पॅनल

रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले व प्रताप मेहोरोलिया यांचा शिंदे गटातील प्रवेशामुळे नाशिक रोडच्या जुन्या २१ प्रभागात स्वयंघोषित पॅनल जाहीर झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट व भाजपची युती झाल्यास संपूर्ण पॅनलकडून शिंदे गटासाठी जागा मागितली जाईल. त्यासाठीच संयुक्तपणे प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाल्यास आयता पॅनल तयार होईल. युती न झाल्यास भाजपच्या इच्छुकांना मुरड घालावी लागेल.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या तेरा नगरसेवकांना मधाचे बोट लावण्यासाठी गेले काही दिवस सतत प्रयत्न केले जात होते. त्यात शिंदे गटात गेलल्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना शहरातील मतदार तसेच त्यांच्या समर्थकांकडूनही फारसा प्रतिसाद नव्हता. वरिष्ठ पातळीवर आपला प्रभाव दिसावा यासाठी त्यांची सर्व धडपड सुरु होती. त्यासाठी प्रत्येक माजी नगरसेवकाला मुबलक प्रसादाचे वाटप झाल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com