Shivsena: आदित्य ठाकरेंच्या स्वागतार्थ पाचोरा मतदारसंघ सजला

शिवसैनिकांचा उत्साह शिगेला; शेकडो दुचाकींच्या रॅलीने होणार जल्लोषात स्वागत
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

पाचोरा : माजी पर्यावरणमंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) हे शिवसंवाद यात्रेनिमित्त आज पाचोरा- भडगाव (Pachora) विधानसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांच्या स्वागतार्थ सारा मतदारसंघ सजला आहे. शिवसैनिकांचा (Shivsena) उत्साह शिगेला पोहोचला आहे. बंडखोर आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या विरोधात त्यांच्या भगीनी वैशालीताई सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांनीच मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय आहे. (Rebel MLA Kishor patil facing political challanges from his Sister)

Aditya Thakre
Nashik News: टोलसाठी पोलिस अधीक्षकांचा ताफाच अडवला!

आदित्य ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर पाचोऱ्याकडे प्रस्थान होणार असून, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे मतदार संघाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत होईल. तेथून शेकडो दुचाकींच्या रॅलीने त्यांना पाचोरा येथे आणले जाईल. दरम्यान मतदारसंघातील लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव, बिल्दी, गोराडखेडा या गावांजवळ त्यांच्यावर पुष्पवृष्टी होणार असून, त्यांचे औक्षणही करण्यात येणार आहे.

Aditya Thakre
Manjula Gavit: एकनाथ शिंदेंकडून मंजुळा गावित यांना ५० कोटींचे गिफ्ट

पाचोरा येथे वरखेडी नाक्यावर आल्यानंतर स्वागत व तिथून जारगाव चौफुली, महाराणा प्रताप चौक येथे त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन होईल. राजे संभाजी चौकात प्रतिमापूजन व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार, त्यानंतर राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्गे त्यांचे शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाकडे प्रस्थान होईल. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन करून हुतात्मा स्मारकात येऊन ते हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत व तेथून शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयासमोर उभारलेल्या भव्य व्यासपीठावर हे उपस्थितांशी शिव संवाद साधतील.

शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा श्री. ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी होऊन सत्तेत आलेल्यांचा खरपूस समाचार आदित्य ठाकरे घेणार असल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. शिवसंवाद नंतर ते मानसिंगका मार्गे निर्मल सीड्समध्ये जावून प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद झाल्यानंतर लोहटार व बांबरुड फाटा येथे त्यांचे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मतदारसंघातील भडगाव येथे मुख्य चौकात त्यांचे शानदार स्वागत करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंसह संजय सावंत, गुलाबराव वाघ, दीपकसिंग राजपूत, ॲड. हर्षल माने, जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील, शरद तायडे हे पदाधिकारी असणार आहेत.

शहर भगवामय

या शिवसंवाद यात्रेसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच ठाकरे व ‘मातोश्री’प्रेमी उपस्थित राहणार असल्याचा विश्वास वैशाली सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात भगवे ध्वज, भव्य डिजिटल बॅनर, पताका लावून मतदारसंघ सजविण्यात आला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com