Jalgaon News: महामार्ग दुरुस्त करा.. अन्यथा ‘वरुन’ कारवाई

खासदार उन्मेष पाटील यांनी ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांना खडसावत रखडलेल्या कामाबाबत जाब विचारला.
MP Unmesh Patil
MP Unmesh PatilSarkarnama

जळगाव : शहरातून (Jalgaon City) जाणाऱ्या महामार्गावरील चौपदरीकरणाचे (Four lane highway) काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्याच पावसाळ्यात महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, (Pits on road) तर अंडरपासमध्ये प्रचंड पाणी साचतेय.. या मुद्यावरुन खासदार उन्मेश पाटलांनी (MP Unmesh Patil) आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘न्हाई’च्या (NHAI) अधिकाऱ्यांस धारेवर धरले. आठवडाभरात महामार्ग चांगला करा, अन्यथा ‘वरुन’ कारवाई होईल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. (MP Unmesh Patil criticise highway authority for bad quality roads)

MP Unmesh Patil
Eknath Khadse: सत्व, तत्त्व, निष्ठा नसेल तर विकासाची कामे व्यर्थ!

जळगाव शहरातून जाणाऱ्या खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या सात किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. गेल्या एप्रिल महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्याचे लोकार्पणही केले.

MP Unmesh Patil
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

कामाचा दर्जा निकृष्ट

या महामार्गाचे काम सुरु असतानाच त्याबद्दल अनेक तक्रारी होत होत्या. चौपदरीकरणात भुयारी मार्गाचे (अंडरपास), आकाशवाणी, इच्छादेवी व अजिंठा चौकातील सदोष सर्कलबाबत तक्रारी व आंदोलने झाली. मात्र ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी हे काम तसेच रेटून पुढे नेले. त्यामुळे आता ते पूर्ण झाल्यानंतर त्यातील निकृष्टपणा समोर येत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी डांबरीकरण खचले तर भुयारी मार्गात प्रचंड पाणी साचून वाहनधारकांचे अपघात होत आहेत.

खासदारांकडून पाहणी

खासदार उन्मेश पाटलांनी आज या महामार्गाची पाहणी केली. सोबत ‘न्हाई’चे अधिकारी सी.एम. सिन्हा, मक्तेदाराचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या महामार्गाची दुरुस्ती व चांगल्या पद्धतीचे काम आठवडाभरात पूर्ण करा, अन्यथा तुमच्यावर ‘वरुन’च कारवाई करुन आणतो, असा इशाराही पाटील यांनी दिला. शिवाय, फागणे- तरसोद टप्प्यातील रखडलेल्या कामाबाबतही त्यांना विचारणा केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com