Eknath Khadse: सत्व, तत्त्व, निष्ठा नसेल तर विकासाची कामे व्यर्थ!

एकनाथ खडसे यांनी पाचोरा येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या मर्मावरच बोट ठेवले.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

पाचोरा : राज्यात (Maharashtra) दत्तक घेऊन मुख्यमंत्री (Chief Minister) केले जात असून, अवघ्या दोन महिन्यात यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला कोठून असा प्रश्न राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपस्थित केला. सत्व, तत्त्व व निष्ठा नसेल तर कोट्यवधीचा निधी व कामांना अर्थ नाही. पावित्र्य नसेल तर कितीही दागिने घालून फिरा ते शोभत नाहीत, असे मत मांडत आमदार खडसे यांनी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटावर (Eknath Shinde Group) बोचरी टीका केली. (Eknath Khadse criticise Eknath Shinde for baseless politics)

Eknath Khadse
Ajit Pawar: शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकले?

पाचोरा पीटीसी संस्थेच्या गो. से. हायस्कूल प्रांगणात अभिमन्यू पाटील व रणजित पाटील यांनी जिजाबाई पाटील यांच्या नावे उभारलेल्या जिजाई रंगमंचाचे व एम. एम. महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्र विस्तारित इमारतीचे उद्घाटन तसेच पाचोरा- भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.

Eknath Khadse
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मान्यवरांचे औक्षण केले. जिजाई रंगमंच बांधून देणाऱ्या अभिमन्यू पाटील, जिजाबाई पाटील व रणजित पाटील यांचा अजित पवार हस्ते सत्कार करण्यात आला. गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, युवक - विद्यार्थी काँग्रेस व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था यांच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, डॉ. सतीश पाटील यांचीही भाषणे झाली. आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या मनोगतात

या प्रसंगी अजहर खान, पंकज गढरी, डॉ. संजीव पाटील, प्रा. सुभाष तोतला, नाना देवरे, सुदर्शन सोनवणे, स्वदेश पाटील, रज्जू बागवान, हरीश पाटील, पिंटू भामरे ,अभिजीत पवार ,महिला आघाडीच्या योजना पाटील, रेखा देवरे, सुचिता वाघ,ज्योती वाघ, वैशाली जडे, प्रकाश भोसले आदी उपस्थित होते.

भडगाव व पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त भडगाव रोड, रिंगरोड, गो. से. हायस्कूल रोड राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, चिन्ह व डिजिटल बॅनरने सजविण्यात आला होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com