Maharashtra Politics : कोळी समाजालाही हवा आहे सरसकट जातीचा दाखला!

Rerervation issue, Koli Community agitation in Jalgaon-जळगावमध्ये सलग २६ दिवसांपासून सुरू असलेले कोळी समाजाचे उपोषण २६ दिवसांनी मागे
Gulabrao Patil with Koli Community agitators.
Gulabrao Patil with Koli Community agitators.Sarkarnama

Jalgaon Politics : आरक्षण आणि जातीच्या दाखल्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असतानाच जळगाव येथेदेखील गेल्या २६ दिवसांपासून कोळी समाजाने जातीच्या दाखल्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. (Guardian Minister take initiative to stop Koli community agitation in Jalgaon)

जळगावचे (Jalgaon) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेले कोळी समाजबांधवाचे उपोषण सोडण्यात आले. आता याबाबत मुख्यमंत्र्यांशी (Eknath Shinde) चर्चा केली जाणार आहे.

Gulabrao Patil with Koli Community agitators.
Drug Mafia Lalit patil : कर्नाटकात ड्रग्ज साम्राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न फसले!

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरे व गावांत हे आंदोलन झाल्याने अन्य सर्व प्रश्न मागे पडले होते. मात्र, याच कालावधीत जळगाव येथे कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत. त्यासाठी शासकीय स्तरावर होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आंदोलन सुरू केले होते. गेले २६ दिवस हे अन्नत्याग आंदोलन सुरू होते.

कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांच्या आंदोलनाची शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या सांगतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच मोठ्या संख्येने कोळी समाजबांधव उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री पाटील यांनी या मागणीसाठी स्वतः पुढाकार घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी ते म्हणाले, की कोळी समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन बैठका आयोजित करण्यात आल्या. कोळी समाजाच्या जातीच्या तसेच इतर विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अधिसंख्यपदांचा सर्वांत मोठा विषय मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे. त्यामुळे हा प्रश्नदेखील निश्चितपणे सुटेल.

Gulabrao Patil with Koli Community agitators.
Maratha Reservation News : येवल्यातील कार्यकर्ते मशाल घेऊन निघाले रायगडावर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com