Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Jalgaon Sabha : सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय दोन महिन्यांत फिरवता अन्‌ मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांचे कारण देता; आव्हाडांचा भाजपला सवाल

Jitendra Awhad News : मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवले जाते. पण, भाजपवाले फक्त भांडण लावून देण्याचे काम करीत आहेत.
Published on

Jalgaon News : केंद्र सरकारने अवघ्या दोन महिन्यांतच सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय फिरविले. मराठा आरक्षणासाठी मात्र सारखं ५० टक्के अटीचे कारण देतात. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यातूनच आम्ही शरद पवारांना विनंती करतो की, पवारसाहेब तुम्ही ४८ खासदारांचे नेतृत्व करा. पंतप्रधानांना सांगा की लोकसभेत कायदा आणा आणि मराठ्यांसाठी १६ टक्क्यांचे आरक्षण तुम्ही लोकसभेत आणा, आता आम्हाला कारणं सांगू नका, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणासाठी केंद्राने वटहुकूम आणावा, अशी मागणी केली. (Reversing two Supreme Court decisions in two months and giving 50 percent reason for Maratha reservation: Jitendra Awad)

जळगाव जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना आमदार आव्हाड यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. आव्हाड म्हणाले की, मागील तीन सभेच्या तुलनेत सर्वात जास्त गर्दी जळगावमध्ये दिसते आहे. जळगावकरांचे शरद पवार यांच्यावर प्रेम आहे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. पण, ताई थोडंसं कमी होतं. एकनाथ खडसे आले आणि आता ते पूर्ण झालं. खडसे आल्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.

Jitendra Awhad
Sharad Pawar On Parliament Session : मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताही अजेंडा दिला नाही; शरद पवारांचा आरोप

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवले जाते. पण, भाजपवाले फक्त भांडण लावून देण्याचे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य सरकारला अधिकाऱ्यांची नियुक्ती बदल्यांचे अधिकारी देण्याचा आदेश दिला हेाता. मात्र, केंद्र सरकारने संसदेत वटहुकूम काढत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा प्रकारे फिरवता येतो, असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.

Jitendra Awhad
Bhatkhalkar Vs Rohit Pawar : ‘आजोबाजीवी नॉटी नातू…’ म्हणत भातखळकरांनी घेतला रोहित पवारांचा समाचार

ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी तीन सदस्यांची समिती असावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यात सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असतील असे सांगितले. पण सत्ताधाऱ्यांना ते पटलं नाही. यावरही वटहुकूम काढत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बदलला. सरन्यायाधीशांना त्या समितीतून बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आणला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दोन निर्णय केंद्र सरकारने दोन महिन्यांत बदलले. त्याच प्रमाणे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम आणावा.

Jitendra Awhad
Jalna Lathicharge: फडणवीसांची माफी म्हणजे ‘कोणी केलं, काय केलं, हे आता....’ ; लाठीहल्लाप्रकरणी पवारांचे गृहमंत्र्यांकडे बोट

वन नेशन, वन इलेक्शनच्या माध्यमातून अध्यक्षीय निवडणूक प्रणाली आणण्याचा प्रयत्न आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखून धरला पाहिजे. ऐन गणेशोत्सवात संसदेचे अधिवेशन बोलवता. हिंदुत्ववादी पक्ष म्हणता आणि हिंदूच्या सणांत संसदेत अधिवेशन बोलावता, हे हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांना शोभत नाही, असा टोलाही आव्हाडांनी लगावला.

Jitendra Awhad
BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

आपल्या पक्षातील काही लोक बाजूला गेले. पण सगळेच लाभार्थी आहेत. जळगाव जिल्ह्यात कोणी पन्नास खोके घेतले, तर आपला ‘गुलाब’ असा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com