Girish Mahajan : आमदार रोहित पवारांना भाजपने घेरलं; आता संकटमोचक गिरीश महाजनांनी केला पलटवार, जय पवारांवरही बोलले

Girish Mahajan ON Rohit Pawar : भाजपकडून गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केल्याने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
Girish Mahajan, Rohit Pawar
Girish Mahajan, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ ला बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघातानंतर हा अपघात आहे की घातपात याच्या चर्चा सुरु झाल्या. विशेष करुन आमदार रोहित पवार यांनी तीन ते चारवेळा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार गंभीर आरोप करत आहेत. भाजपकडून गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केली. त्यानंतर आता भाजपकडूनही त्यांना घेरले जात असून पलटवार केले जात आहेत.

भाजपकडून आता रोहित पवारांना कोडींत पकडले जात असल्याचे दिसत आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळेच विमान अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप करून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर रोहित पवार यांनी भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे म्हणत हा आरोप फेटाळला.

भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे रोहित पवार यांनी म्हटल्याने ते मंत्री गिरीश महाजन यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. अजित दादांच्या अपघाती निधनाचे राजकारण करू नये, असे महाजन यांनी म्हटले. राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही असे वलगर विधान करू नये असा पलटवार महाजन यांनी केला आहे.

Girish Mahajan, Rohit Pawar
Nashik Crime : वारंवार गुंगारा देणारा ‘पुष्पा’ अखेर जाळ्यात; नाशिक न्यायालयाच्या आवारातच वनपथकाने ठोकल्या बेड्या

महाजन म्हणाले, कुणी उगाच काहीही बोलू नये. कोणी म्हणतो बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतात, पायलटच्या माध्यमातून सुसाईड बॉम्ब तयार झाला. आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू नये असं मला वाटतं या भाषेत त्यांनी टीका केली. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. प्रत्येकाला सत्य काय ते बाहेर यावे असेच वाटत आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणीही असे व्हल्गर विधान करु नये असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan, Rohit Pawar
Ramdas Athawale : रामदास आठवले हे काय बोलून गेले ; म्हणे, 'मी सोबत आहे तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील'

जय पवारांबाबत काय बोलले महाजन?

अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या अपघाताची केंद्र सरकारकडून अतिशय गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे. तरी पण कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. काही मागणी करायची असेल तर ती करावी. कुठेही त्यामध्ये संभ्रम असण्याची शक्यता काडीमात्र नाही. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये 100 टक्के पारदर्शकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com