Rohit Pawar Politics: रोहित पवार यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचले, म्हणाले, ‘हा तर त्यांचा हनिमून टाईम’

Rohit Pawar; honeymoon time at present for Ajit Pawar and Eknath Shinde-जिल्ह्यात किती पैसा यावर डोळा ठेवून पालकमंत्री नियुक्तीची होते आहे मागणी
Rohit Pawar, Ajit Pawar & Eknath shinde
Rohit Pawar, Ajit Pawar & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News: मोठे बहुमत असूनही महायुतीच्या सरकारमध्ये अस्वस्थता आहे. त्यातील राजकीय अस्थिरता लपून राहिलेली नाही. त्यामुळे महायुतीचे सरकार सध्या विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले आहे. हे दोन्ही मुख्यमंत्री काय काम करतात हा प्रश्नच आहे. कारण ते आपल्या मंत्र्यांचे देखील समाधान करू शकत नाही. त्यांच्यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

Rohit Pawar, Ajit Pawar & Eknath shinde
Raj Thackrey Politics: भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट!

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा सध्या हनिमून टाइम सुरू आहे. त्यामुळे सगळेच आनंदात दिसतात वास्तविक स्थिती काही वेगळेच सांगत आहे. सध्याचे राज्य सरकारचे राजकीय संकेत फारसे चांगले नाहीत, अशी टीका आमदार पवार यांनी केली.

Rohit Pawar, Ajit Pawar & Eknath shinde
Trimbakeshwar Dindi: निवृत्तीनाथ दिंडीच्या सेवेच्या परंपरेतून "एक है तो, सेफ है" ला कडक उत्तर!

पालकमंत्री नियुक्ती वरून असंतोष आहे. रायगडला एकनाथ शिंदे पक्षाच्या मंत्र्याच्या समर्थकांनीच आंदोलन केले. नाशिक मध्ये ही खदखद व्यक्त झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगित करावी लागली.

पालकमंत्र्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दोघेही आग्रही आहेत. पालकमंत्र्यांच्या नियुक्ती मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पैसा आहे, हे पाहून मागणी केली जात आहे, अशी गंभीर टिका त्यांनी केली. त्यामुळेच महायुतीच्या तिन्ही पक्षांचे नियुक्तीबाबत समाधान होणे अवघड दिसते.

एकंदरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आगामी काळात आपले काही खरे नाही, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिर्डी येथे अधिवेशन घेतले. उपमुख्यमंत्री शिंदे ठिकठिकाणी आभार यात्रा काढत आहेत.

यावर तोडगा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिन्ही घटक पक्षांचे तीन पालकमंत्री नियुक्त करावेत, म्हणजे सगळेच समाधानी तरी होतील, असा चिमटा आमदार पवार यांनी घेतला. सरकारमध्ये असले तरी त्यांना पक्ष संघटना आणि पक्षाचा विस्तार महत्त्वाचा वाटू लागला आहे. त्यामागे भविष्यातील २०२९ च्या निवडणुका आहेत, असा दावा आमदार पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com