Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar News : दिल्लीवारी करणाऱ्या नेत्यांवर रोहित पवार घसरले

Loksabha Election updates : सत्ता व पदांसाठी काही नेते सतत दिल्ली वाऱ्या करू लागल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. दिल्लीवारी करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Published on

Nashik farmers Politics: भाजपच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. निर्यातबंदीचा मोठा फटका नाशिकच्या शेतकऱ्यांना बसला. त्याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. (latest news maharashtra politics)

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीत सटाणा येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. या वेळी आमदार पवार यांनी भाजप (BJP) आणि सत्तेसाठी भाजपशी जवळीक साधणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

आमदार पवार म्हणाले, आता लवकरच गुजरातमधील कांदा येणार आहे. गुजरातच्या कांदा उत्पादकांना केंद्र शासनाच्या धोरणाचा कोणताही फटका बसणार नाही. मात्र, भाजप सरकारने गेल्या चार महिन्यांपासून विविध बंधने लादून या भागातील कांदा उत्पादकांना अडचणीत आणले आहे. कसमादे परिसरात सर्वाधिक कांदा पिकतो. भाजप सरकारच्या निर्णयाचा फटकादेखील या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. त्याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. शेतकरी आता भाजपला त्याची योग्य परतफेड करतील. Maharashtra latest news politics

Rohit Pawar
Lok Sabha Election 2024 : लाल वादळ बिघडवणार शरद पवारांचं गणित?

आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता त्यांनाही चिमटा काढला. ते म्हणाले, महाराष्ट्र (Maharashtra latest news politics) कधी दिल्ली पुढे झुकला नाही. मात्र, काही नेते आता सत्ता आणि पदांसाठी भाजपपुढे झुकले आहेत. सत्ता आणि पदांसाठी ते रोज दिल्ली वाऱ्या करीत आहेत. जनतेच्या हितासाठी किंवा राज्याच्या प्रश्नांसाठी त्यांनी दिल्ली वारी केली असती, तर जनतेला दिलासा मिळाला असता. Rohit Pawar has criticized that some leaders are constantly moving to Delhi for power and positions.

भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे. महाराष्ट्र एक उत्तम राजकीय संस्कृती व परस्परांशी आदरभावना राखणारा प्रदेश आहे. मात्र, सध्या पक्षांमध्ये फोडाफोड करून आणि तपास यंत्रणांची भीती दाखवून राजकारण केले जात आहे. हे रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव केला पाहिजे. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी झोकून देऊन प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी माजी आमदार दीपिका चव्हाण, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण, केशव मांडवडे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, 'मविप्र' संस्थेचे उपसभापती नानाजी दळवी, पंडितराव निकम, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, संगीता पाटील, उषाताई भामरे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार पवार यांचे स्वागत केले.

Edited By : Rashmi Mane

R

Rohit Pawar
Rohit Pawar News : राष्ट्रवादीच्या दोन गटांतून विस्तवही जात नसतानाच रोहित पवारांनी केला 'हा' राजकीय संकल्प

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com