Lok Sabha Election 2024 : लाल वादळ बिघडवणार शरद पवारांचं गणित?

Dindori Lok Sabha Election 2024 : महाविकास आघआडीनं दिंडोरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडला आहे. पण...
sharad pawar cpim
sharad pawar cpimsarkarnama
Published on
Updated on

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ( Dindori Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भास्करराव भगरे ( Bhaskarrao Bhagare ) यांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विरुद्ध भगरे या लढतीत आता एक नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या गटाचे गणित बिघडू शकते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ( Dindori Lok Sabha Constituency ) आदिवासी राखीव आहे. या मतदारसंघात उमेदवार आदिवासी असला तरी बहुसंख्य मतदार मात्र शेतकरी आणि खुल्या गटातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल प्रामुख्याने बहुजन समाजाचा कल काय आहे, यावर ठरतो. आता मात्र या मतदारसंघात आदिवासी समाजातील घटकांच्या मतदानाबाबत एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार ( Sharad Pawar ) गटाला सोडला आहे. पण, येथे सुरगाणा या विधानसभा मतदारसंघात 'सीपीएम'चे माजी आमदार जे. पी. गावित यांचा प्रभाव आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या 'सीपीएम' पक्षाने राज्यात किमान एक जागा मिळावी, असा आग्रह धरला आहे. त्याची फारशी दखल महाविकास आघाडीने घेतलेली नाही. त्यामुळे आता जे. पी. गावित या मतदारसंघातून उमेदवार देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे अचानक दिंडोरी मतदारसंघात नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

sharad pawar cpim
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला एकटे पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न?

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नुकतेच मुंबईत शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. या वेळी त्यांनी भाजपच्या डॉ. भारती पवार या कोकणा समाजाच्या आहेत. कोकणा समाजाचे या मतदारसंघात साडे चार लाख मतदार आहेत. राष्ट्रवादीने दिलेले भगरे हे कोळी समाजाचे आहेत. या मतदारसंघात कोळी समाजाची सुमारे एक लाख मते आहेत. त्यामुळे उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी विनंती या नेत्यांनी केली. शरद पवार यांनीदेखील या नेत्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांनी काही सूचना दिल्या. तसेच या शिष्टमंडळाला जयंत पाटील यांची भेट घेण्याची सूचनादेखील केली होती. त्यामुळे आता येथील उमेदवार बदलणार का? ही चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाकडे चिंतामण गावित हे सुरगाणातील उमेदवार इच्छुक आहेत. चिंतामण गावित यांची मदत जे. पी. गावित यांना विधानसभा निवडणुकीसाठी होऊ शकते. त्यामुळे चिंतामण गावित त्यांना उमेदवारी दिल्यास ते कोकणा समाजाचे आहेत. त्याचा लाभदेखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. याशिवाय जे. पी. गावित आपल्या उमेदवारीचा फेरविचार करू शकतील. या नव्या राजकीय ट्विस्टमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नवी चर्चा सुरू झाली आहे.

sharad pawar cpim
Subhash Bhamre News: उमेदवार बदला; BJP कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना ई-मेल; डॉ. सुभाष भामरे अस्वस्थ

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन होण्याआधी राज्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ असे त्याचे वर्णन केले जात होते. सध्या राष्ट्रवादीने शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नितीन पवार, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ आणि छगन भुजबळ हे चार आमदार शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झाले आहेत. या स्थितीत आगामी लोकसभेची लढत अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यात लाल वादळ शरद पवार यांची वाट अडविण्याची शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

sharad pawar cpim
Girish Mahajan News : महाजनांच्या पोटातले ओठावर आलेच; म्हणाले, 'त्यांचा' अन् माझा छत्तीसचा आकडा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com