Rohit Pawar News : दिवाळी फराळाला राजकीय फोडणी; राम शिंदेंचे पार्थ पवारांना आमंत्रण, रोहित पवार स्पष्टच बोलले...

Parth Pawar Ram Shinde Meeting Rohit Pawar Reaction : दिवाळीत राजकीय फटाके फुटले आता फाराळा राजकीय फोडणीही बसत आहे. नगर जिल्ह्यात दोन पवारांवरून राजकारण तापलं आहे...
Rohit Pawar, Parth Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Parth Pawar, Ram Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे यांनी देखील आज चौंडी (ता. जामखेड) येथे, तर राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांचा पारनेर येथे दिवाळी फराळाचा कार्यक्रम होत आहे. भाजप आमदार राम शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी पार्थ पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या आमंत्रणावर आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांनी चिमटा काढला आहे.

Rohit Pawar, Parth Pawar, Ram Shinde
Ahmednagar Politics: राम शिंदे-नीलेश लंकेंनी केला दिवाळीत 'राजकीय' फराळ; एकमेकांना भरवली बालुशाही !

आमदार रोहित पवार म्हणाले की, "दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी आज कार्यक्रम ठेवला आहे मी दिवाळीच्या वेळेसच कार्यक्रम घेतला. दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवणे हा देखील महत्त्वाचा भाग आहे. पार्थ पवार जामखेड येथे दिवाळीला फराळात येत असतील, तर काही हरकत नाही. आल्यावर पाहू". मोठ्या नेत्यांनी काही नेत्यांच्या घरी जाऊन फराळ खाणं हे महत्त्वाचेच आहे. फराळाला जाणे हे चुकीचे नाही. मी दिवाळी लोकांमध्ये साजरी केलेली आहे. मी माझ्या पद्धतीने काम करतो इतर लोक त्यांच्या पद्धतीने काम करतात. मी माझ्या पद्धतीबद्दल बोलू शकतो दुसऱ्यांच्या कामाबद्दल आणि स्टाईल बद्दल मी काहीही माहिती ठेवत नाही, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार रोहित पवार आज नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकासकामांसह नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे नेते आमदार प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला पार्थ पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावरही त्यांनी चिमटा घेतला. पार्थ पवार आल्यावर पाहू. मोठे नेते नेत्यांच्या घरी येणे महत्त्वाचे आहे, असेही ते बोलले.

नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांनी देखील दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला. आमदार राम शिंदे आणि आमदार नीलेश लंके हे सध्या एकमेकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. यातच आमदार राम शिंदे यांनी पार्थ पवार यांना आज दिवाळी फराळाला आमंत्रित केल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये आमदार राम शिंदे यांनी पवार कुटुंबीयांना आमने-सामने आणण्याचे राजकीय खेळी केली आहे. आमदार रोहित पवार ह्या राजकीय खेळीला कसे उत्तर देतात हे पुढे दिसून येईलच.

Rohit Pawar, Parth Pawar, Ram Shinde
Parner Politics: नीलेश लंकेंचं टेन्शन वाढणार ? रोहित पवारांनी विजय औटींना दिला मोठा शब्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com