Radhakrishna Vikhe Patil: दूधदराबाबत तातडीची बैठक; मंत्री विखे पाटलांचा खासगी दूध संघावर कारवाईचा इशारा

Private Milk Institution and Milk Price Protest : खासगी दूध संकलन संघ तांत्रिक बाबींचा आधार घेत दूध उत्पादकांना अगदी कमी दर देत आहेत.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: शासनाने तीन महिन्यांपूर्वी शासकीय आणि खासगी दूध संकलन करणाऱ्या संघांना दुधाला किमान 34 रुपये प्रतिलिटर भाव देण्याचे आदेश दिलेले असताना विशेषतः खासगी दूध संकलन संघ तांत्रिक बाबींचा आधार घेत दूध उत्पादकांना अगदी कमी दर देत आहेत.

ही दूध उत्पादकांची फसवणूक असून, सरकार या गोष्टींकडे कानाडोळा करू शकत नाही, त्यामुळे येत्या सोमवारी 20 नोव्हेंबरला शासकीय आणि खासगी दूध संघांची बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल आणि किमान दर 34 देण्यास सांगेन. मात्र, यावर कार्यवाही न करणाऱ्या संघांबाबत कडक धोरण घेतले जाईल, असा इशारा पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे.

आज बलिप्रतिपदेच्या दिवशीच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या वतीने राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानी दूध दरवाढ मुद्द्यावर खर्डा-भाकरी खाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विखे यांच्या वतीने वेगाने हालचाली करून खोत यांना आंदोलन न करता नगर इथे बैठक घेऊन चर्चेला येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Radhakrishna Vikhe Patil
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी पुन्हा 'ट्रॅक'वर; लोकसभेसाठी असा ठरला फॉर्म्युला ?

विखे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खोत यांनी लोणी येथील आंदोलन रद्द करून नगर इथे जिल्हाधिकारी कार्यालयात राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठकीस होकार कळवला. त्यानुसार आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस रयत क्रांती संघटनेचे राज्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, लोणीत खर्डा-भाकरी खाऊन आंदोलनाचा इशारा देणारे सदाभाऊ खोत बैठकीस अनुपस्थित होते. ते मुंबईला असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

दरम्यान, दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष भाऊ मांडे, राहुरी तालुकाध्यक्ष सतीश पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाचा 34 रुपये किमान भाव मिळत नसून केवळ 26-27 रुपये प्रतिलिटर भाव मिळत असल्याबद्दल मंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली.

Radhakrishna Vikhe Patil
Solapur Politics : मोहिते पाटलांनी वाढवले भाजपचे टेन्शन; माढ्यातून लोकसभा लढविण्याची केली घोषणा

या वेळी दूधदराबरोबरच पशुधन, पशुखाद्य याबाबत शासनाने दूध उत्पादकांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच दूध भेसळ प्रचंड प्रमाणात वाढली असून, सोलापूर जिल्हा दूध भेसळीत अव्वल असल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील दूध संघाच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी केली. दूध भेसळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम दूधदर कोसळण्यात होत असल्याचे विखे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या सर्व प्रश्नांवर येत्या सोमवारी 20 नोव्हेंबर रोजी मुंबईत तातडीची बैठक बोलावत असल्याचे घोषित केले. बैठकीस शासकीय आणि विशेष करून खासगी दूध संकलन करणारे दूध संस्थांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येणार असून, या बैठकीत गेल्या तीन महिन्यांत दूध उत्पादकांना 34 रुपये दर शासनाने आदेश दिलेला असताना प्रत्यक्षात असा दर दिला, याची माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले.

तसेच यापुढे दुधाला किमान 34 रुपये दर न देणाऱ्या दूध संघांवर शासन कडक धोरण अवलंबणार असल्याचेही विखे यांनी या वेळी सांगितले. राज्यातील दूध संघाचे दूध संकलन करणारी शासनाचा उपक्रम असलेली 'महानंदा' संस्थेची अवस्था गैर कारभारामुळे मोडकळीस आली आहे.

अशात राज्यातील दूध संघ मदर डेअरी आणि अमूल डेअरीला राज्यात येऊ देत नाही, तसेच स्वतःही दुधाला चांगले दर देत नाही, असे विखे यांनी सांगत खंत व्यक्त केली. मात्र, महानंदाबाबत शासनाने विविध पर्याय दिले असून, यातून काही मार्ग निघेल अशी आशा व्यक्त केली.

Edited by : Ganesh Thombare

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Congress: महाराष्ट्रात लवकरच काँग्रेसचा मोठा धमाका; नाना पटोलेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com