Rohit Pawar News: रोहित पवार म्हणाले; शाब्बास ! हे यश सर्वस्वी 'इस्त्रोचे'...

Rohit Pawar Reaction On Chandrayaan-3: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेने सर्व भारतीयांची मान आज जगात ताठ झाली आहे.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

ISRO Moon Mission: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेने सर्व भारतीयांची मान आज जगात ताठ झाली आहे. मागील मोहीम फसल्याने त्याच बरोबर रशियाच्या लुना यानाचे तीन दिवसांपूर्वीच आलेले अपयश पाहता केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल लागून होते. इस्रोच्या शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रंज्ञ डोळ्यात तेल घालून या क्षणांची वाट पाहत होते. अशात आज (23 ऑगस्ट) सायंकाळी यशस्वी लँडिंग झाले आणि अवघ्या भारतात एकच जल्लोष झाला. इस्रोच्या या यशस्वी कामगिरीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

शाब्बास! म्हणत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, इस्त्रोच्या तमाम शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या प्रयत्नांमुळेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मजल मारणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या क्षणाची नोंद जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल आणि प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. हे यश सर्वस्वी इस्त्रोचे आणि इस्त्रोची स्थापना करण्यापासून संशोधनासाठी वेळोवेळी चालना देणाऱ्या प्रत्येक सरकारचे आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Rohit Pawar News
Eknath Shinde On Chandrayaan-3 Landing : चांद्रयान- ३ मोहीम फत्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

चांद्रयान-२ मोहीम चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अयशस्वी झाली होती. मात्र, त्यानंतर इस्रोने नियोजित चांद्रयान-३ मोहीम हाती घेतली होती. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ ला दुपारी २:३५ वाजता झाले आणि आज त्याचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले.

Rohit Pawar News
Sharad Pawar News : नेहरूंनी वैज्ञानिकांना दिलेल्या प्रोत्साहनाचे चीज झाले ; पवारांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

दरम्यान, संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. या मोहिमेत अनेक अवघड टप्पे यशस्वीरित्या पार केले. त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांची (India) उत्सुकता आणखी वाढू लागली होती. मात्र, भारताच्या शास्त्रज्ञांनी आपले कर्तृत्व दाखवून देतानाच 140 कोटी भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवला. चांद्रयान-३ चे यशस्वी लॅंडिंग मुळे भारताच्या शिरपैचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com