Eknath Shinde On Chandrayaan-3 Landing : चांद्रयान- ३ मोहीम फत्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Chandrayaan-3 Landed Successfully : '' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी दिवस-रात्र एक केला, त्यांचे...
Eknath Shinde - Chandrayaan-3 Landing
Eknath Shinde - Chandrayaan-3 Landing Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : भारताने बुधवारी नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान- ३ चे यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाले आहे. दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. तसेच भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लॅंडिंग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोसह संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन केले आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन करतानाच त्यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे , संशोधकांचे अभिनंदन करताना त्यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. शिंदे म्हणाले, चांद्रयान- ३ मोहिमेचे यशस्वी लॅंडिग हे पहिलं पाऊल आहे. खऱ्या अर्थाने या देशाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवणारा हे ऐतिहासिक अभियान, गौरवाचा क्षण आहे.

Eknath Shinde - Chandrayaan-3 Landing
PM Modi On Chandrayaan 3: भारतासाठी अविस्मरणीय क्षण ! : 'चांद्रयान-3' ची चंद्रावर यशस्वी लँडिंग; पंतप्रधान मोदींनी 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. १४० कोटी जनता आहेच. पण जगभरात देशाचे,प्रधानमंत्र्यांचे आणि त्याचबरोबर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी दिवस-रात्र एक केला, त्यांचे कौतुक केले जात आहे असेही ते म्हणाले.

'' भारत हा देशातील पहिला देश...''

चांद्रयान- ३ मोहिमेतील वैज्ञानिक, संशोधकांचे अभिनंदन संपूर्ण देश करतोय. चंद्रावरचं यशस्वी लॅंडिंग ही आपल्यासाठी अभिमानाची,गर्वाची बाब आहे. भारताचे अवकाशातील संशोधनाचे पहिले पाऊल, जे श्रेष्ठत्व, यश आहे ते आजच्या मोहिमेने सिध्द करुन दाखवले आहे. साऊथ पोलवर यशस्वीपणे लॅंडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे असेही कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Eknath Shinde - Chandrayaan-3 Landing
Ranjitsinh Nimbalkar News : '' आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार!'' ; खासदार निंबाळकरांचा सांगोलेकरांना शब्द

भारताची चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी होण्यासाठी गेल्या 24 तासांपासून देशभरातील ठिकठिकाणी प्रार्थना, होमहवन करण्यात आले. अखेर सहा वाजून पाच मिनिटांनी प्रत्येक भारतीयाच्या प्रार्थनेला आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश आले आणि चांद्रयानाचे यशस्वीपणे लॅंडिंग झाले.

चांद्रयान 3 श्रीहरीकोटा येथून 14 जुलैला चंद्राच्या दिशेने झेपावले होते. या मोहिमेत अनेक अवघड टप्पे यशस्वीरित्या पार केले. वेळोवेळी फोटो पाठवण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीयां(India) ची उत्सुकता आणखी वाढू लागली होती. चांद्रयान- ३ लँड होण्याच्या काही दिवसांआधी रशियाचं लुना-25 हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळल्यामुळे त्यांची मोहीम अपयशी ठरली होती. मात्र, भारताच्या शास्त्रज्ञांनी आपले कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवून देतानाच 140 कोटी भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com