BJP News : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; अकाली दल, अन्नाद्रमुकचे नेते भाजपमध्ये...

Inder Iqbal Singh Atwal, DR Maitreyan to Join BJP : शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर अकाली दलाने भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
Inder Iqbal Singh Atwal
Inder Iqbal Singh AtwalSarkarnama

Inder Iqbal Singh Atwal Aiadmk DR Maitreyan to Join BJP : गेल्या काही दिवसापासून काँग्रेससह अन्य पक्षातील काही नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. आज (रविवारी) शिरोमणी अकाली दलाचे (SAD)नेते, माजी आमदार इंदर इकबाल सिंह अटवाल यांनी दिल्लीच्या कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

इंदर इकबाल यांचे वडील चरणजीत सिंह अटवाल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते आहेत. अन्नाद्रमुक नेता आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. मैत्रेयन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अकाली दल पहिल्यांदा भाजपचा मित्रपक्ष होता, पण गेल्या वर्षी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर अकाली दलाने भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पंजाबमध्ये जालंधर येथे लोकसभेची पोटनिवडणुक होत आहे, या जागेसाठी इंदर अटवाल हे भाजपचे उमेदवार असतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Inder Iqbal Singh Atwal
Rajasthan Congress News : आपल्याच सरकारच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्र्याचं धरणे आंदोलन ; CM गेहलोत यांच्यावर हल्लाबोल

काल (शनिवारी) सीआर केसवन हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. काही महिन्यापूर्वी केसवन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रभावित झाल्याने मी भाजपमध्ये सामील होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Inder Iqbal Singh Atwal
Karnataka Elections 2023 : राहुल गांधी यांचा दौरा रद्द होताच कार्यकारी अध्यक्षपदी बीएन चंद्रप्पा..

काही दिवसापूर्वी जालंधर पश्चिमचे माजी आमदार सुशील रिंकू यांनीही काँग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना जालंधर लोकसभेसाठी आम आदमी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. सुशील रिंकू यांनी या मतदार संघातून 2012 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीत आपचे उमेदवार शीतल अंगुरल यांनी त्यांचा पराभव केला होता.

Inder Iqbal Singh Atwal
Sharad Pawar News : ‘अदानी’ बाबत पवारांच्या भूमिकेवरुन काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये Twitter वॉर रंगले..

काँग्रेसचे नेते अनिल अँटनी, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून काही जण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेता चरणजीत सिंह चन्नी हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com