Rupali Chakankar Politics: रूपाली चाकणकर यांची फुशारकी... म्हणाल्या, विरोधक पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागतात...

Rupali chakankar; Chakankar says I took action in the Hagwane case, it was the police Department fault -रूपाली चाकणकर यांनी वैष्णवी हागवणे प्रकरणातील दिरंगाईचा दोष पोलिसांवर ढकलला
Rupali_Chakankar
Rupali_ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे महिला आयोग आणि अध्यक्षा रूपाली चाकणकर चर्चेत आल्या आहेत. यासंदर्भात महिला आयोगाने या प्रकरणात राजकीय हितसंबंध पाहिले, असा आरोप केला जात आहे.

पुण्याच्या वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळी झाला. याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याबाबत योग्य कार्यवाही न झाल्याने हगवणे हिचा बळी गेल्याची टीका होत आहे. त्याला रूपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा किरकोळीत काढत दुर्लक्ष केले आहे.

या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. एक महिला संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संदर्भात श्रीमती चाकणकर यांना विचारले असता त्यांनी या सर्व मागण्या किरकोळीत काढल्या. एकंदरच या प्रकरणावर त्या टीकाकारांना फारसे महत्त्व देत नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

Rupali_Chakankar
Mahayuti Politics: गिरीश महाजनांची खेळी, भाजप प्रबळ तर विरोधी पक्षाची अस्तित्वासाठी धडपड!

याबाबत श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राजीनामा कोणाचाही मागितला जातो. देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा देखील राजीनामा मागितला जातो. लोकशाहीत विरोधी पक्ष आपले काम करीत असतो. राजीनामा मागतात ते त्यांचे कामच असते, या शब्दात चाकणकर यांनी राजीनाम्यावरील भाष्य केले.

Rupali_Chakankar
Sanjay Raut Politics: धक्कादायक... 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी खंडणीतून दुबई आणि लंडनला मालमत्ता खरेदी केल्या?

महाराष्ट्रात सर्वाधिक कडक कायदे आहेत. तर त्याची अंमलबजावणी केली जात नाही. नागरिक आणि महिला याबाबत उदासीन असतात. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. वैशाली हगवणे प्रकरणात महिला आयोगाने आपले काम चोखपणे केले आहे. वेळेतच पोलिसांना याबाबत कारवाईच्या सूचना केल्या होत्या. एफ आय आर दाखल होण्यास विलंब झाला. त्यात कोण दोषी आहे हे शोधण्याचे काम सुरू आहे.

राज्यात महिला गर्भ लींग निदान चाचण्यांना बंदी असल्या तरी चाचण्या करतता. स्त्री गर्भ असल्यास गर्भपात केला जातो. शालेय प्रमाणपत्रात दुरूस्ती करून बालविवाह केले जातात. नोकरीच्या ठिकाणी आवश्यक त्या महिला सुरक्षिततेबाबत समित्या कार्यरत नसतात. याबाबत आयोगाने सध्या महिलांच्या सर्व तक्रारी एैकण्याची भूमिका घेतली आहे.

हुंडा देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हे आहेत. कोणी हुंडा मागत असेल तर तातडीने पोलिसांत तक्रार केली पाहिजे. मात्र टीकाकार आणि विरोधकांना वाटते सगळे काम महिला आयोगानेच केले पाहिजे. असे कसे होऊ शकते, असा प्रतीप्रश्न रूपाली चाकणकर यांनी केला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com