Rupali Chakankar Politics: नाशिकच्या जिल्हा परिषद महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या पाठपुराव्याला यश

Rupali Chakankar; Nashik ZP female employee exploitation, finally state womens Commission finally took serious followup-महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाशिकच्या जिल्हा परिषद महिला कर्मचारी लैंगीक शोषणाबाबत पोलिसांना दिले खास आदेश.
Rupali_Chakankar
Rupali_ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News: गेले काही दिवस नाशिक जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगीक शोषणाचे प्रकरण गाजते आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले. आता याबाबत पोलिसांनी विशाखा समितीच्या कारवाईची माहिती घेत त्यात लक्ष घातले.

नाशिकच्या जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने संबंधित उप कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभर संबंधित अधिकारी महिला कर्मचाऱ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत होता. प्रकरण खूपच खालच्या थराला गेल्यावर संबंधित महिलांनी आवाज उठवला. जवळपास ३० महिलांचे लैंगिक शोषण संबंधित अधिकाऱ्याने केल्याची तक्रार प्रशासनाला दाखल झाली होती. याचे वृत्त झळकताच अनेकांना धक्का बसला.

Rupali_Chakankar
Nashik honey trap case: हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनीच फेटाळले... विरोधी पक्ष हतबल की असहाय?

या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी विशाखा समितीला चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे प्रकरण घडल्याचे समजताच त्यांनी एक्स वर पोस्ट टाकत त्याची गंभीर दखल घेतली.

या प्रकरणात जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव होता. संबंधित अधिकारी कार्यालय प्रमुख असल्याने या महिलांवर बदली तसेच अन्य प्रकारच्या कारवाईची भीती दाखविली जात होती. या महिलांना मानसिक व प्रशासकीय स्तरावर पाठिंब्याची आवश्यकता असताना रुपाली चाकणकर यांनामानसिक पाठींबा पिडीतांना धीर देणारा ठरला. त्यातून विशाखा समितीकडे तक्रारींवर महत्त्वाची माहिती पिडीतांनी दिली.

या प्रकरणात विधान परिषदेत चर्चा झाल्यावर संबंधित अधिकाऱ्याला थेट निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्व कारवाईत राज्य महिला आयोगाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. याबाबत आता राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नाशिकच्या पोलिसांना पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे.

पोलिसांकडून ही माहिती राज्य महिला आयोगाला सादर केली जाणार आहे. एकंदरच राज्य महिला आयोगाने या प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आता संबंधीत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची विभागीय चौकशी सुरू होणार आहे. पिडीत महिलांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com