Nashik honey trap case: हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनीच फेटाळले... विरोधी पक्ष हतबल की असहाय?

Devendra fadnavis;The Chief Minister himself resolved the honey trap case, was it political fear or pressure from officials?-नाशिकच्या हानी ट्रॅप प्रकरणात बहुतांशी उच्च पदस्थ पोलीस अधिकारी अडकण्याची शक्यता चर्चेत होती.
Honey-Trap-News-
Honey-Trap-News-Sarkarnama
Published on
Updated on

Nashik honey trap News: सबंध प्रशासन आणि काही मंत्र्यांना हादरा देणारे हनी ट्रॅप प्रकरण चर्चेतच प्राण सोडण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सर्व शक्यता फेटाळले आहेत. यामध्ये राजकीय हुशारी की दबाव याची चर्चा मात्र कायम आहे.

नाशिकच्या एका राजकीय नेत्याच्या रिसॉर्टवर हनी ट्रॅप प्रकरण घडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवला होता. मात्र हा पेन ड्राईव्ह गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलाच नाही असा धक्कादायक आरोप थेट मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाचे रसभरीत वर्णन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आमदार आव्हाड यांनी दिलेल्या माहितीत संदर्भ आणि बरेचसे तथ्य मॅच होत होते. या प्रकरणाविषयी थेट पोलिसात तक्रारी दाखल झालेल्या होत्या. असे असतानाच शासनाने हे प्रकरण घडलेच नाही, असे सांगत कानावर हात ठेवले आहेत.

Honey-Trap-News-
Bacchu kadu : बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा!

नाशिकचे आणि ट्रॅप प्रकरण चर्चेच्या पातळीवरच संपणार का याची चर्चा कायम आहे. प्रकरणात राज्यभरातील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी अडकलेले आहेत, असा आरोप आमदार आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात ठाणे पोलिसात पहिली तक्रार दाखल झालेली होती. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशन संपल्याने या प्रकरणावर देखील पडदा पडण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे आमदार आव्हाड यांनी दिलेला इशारा होय. असाच प्रकार शेजारच्या गुजरात राज्यात घडला होता. त्याला गुजरात पॅटर्न असे संबोधण्यात आले. यामध्ये काही आत्महत्या झाल्या तर काहींच्या राजकीय आयुष्याला फुल स्टॉप मिळाला.

हनी ट्रॅप प्रकरणाचा राज्य सरकारला देखील हादरा बसण्याची शक्यता होती. त्यात काही मंत्र्यांचीही नावे दबक्या आवाजात घेतली जात होती. यासंदर्भात थेट राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बातमी लीक केली होती. आता राज्य सरकार या प्रकरणावर पडदा टाकण्यात यशस्वी झाले असे म्हणता येईल.

सरकारला अडचणीत आणणारे हे प्रकरण अर्धवट सोडून दिल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांची हतबलता की शरणागती अशी चर्चा पुढे येऊ लागली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत एक पेन ड्राईव्ह विधानसभेत दाखवला होता. हा पेन ड्राईव्ह पोलीस यंत्रणेकडे किंवा गृह विभागाकडे का पोहोचला नाही? हा चर्चेचा विषय आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडे हा पेन ड्राईव्ह अद्यापही असल्यास भविष्यात त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण इथे थांबले, तरी कायमचे संपले असे म्हणावे का? असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे हनी ट्रॅपचे भूत आता बाटलीत बंद झाले आहे, ते कायमचे बंद होणार की राजकीय सोयीने पुन्हा बाटलीबाहेर येणार ही चर्चा कायम राहील.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com