Sachin Tendulkar Bodyguard : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; डोक्यात गोळी झाडली...

Crime News : कापडे हे 'एसआरपीएफ'मध्ये भरती झाले होते. यानंतर त्यांची पोस्टींग तेंडुलकर यांचे अंगरक्षक म्हणून झाली होती.
Sachin Tendulkar bodyguard
Sachin Tendulkar bodyguardSarkarnama

Jamner News : क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे अंगरक्षक राहिलेले प्रकाश कापडे यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर येथील जळगाव रस्ता गणपती नगर या ठिकाणी रहिवासी असलेल्या प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडून घेत, आपले जीवन संपवले. त्यांचं वय 37 वर्षे इतकं होतं. बुधवारी पहाटे त्यांनी आत्महत्या केली. (Latest Marathi News)

Sachin Tendulkar bodyguard
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

सचिन तेंडुलकर हे प्रकाश कापडे (Prakash Kapade) हे सचिन तेंडुलकर यांचे अंगरक्षक राहिले होते. कापडे हे 'एसआरपीएफ'मध्ये भरती झाले होते. यानंतर त्यांची पोस्टींग तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे अंगरक्षक म्हणून झाली होती. ते मुंबईत (Mumbai Crime News) तेंडुलकर यांच्या बॉडी गार्ड म्हणून आपलं कर्तव्यात रुजू होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sachin Tendulkar bodyguard
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

काल रात्री (दि. 14 मे) रोजी रात्रीच्या वेळी यांनी घरामध्ये डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस (Police) स्टेशन येथील इन्स्पेक्टर किरण शिंदे व त्यांच्या सहकारी पोलिस कापडे यांच्या घरी दाखल झाले. आता त्यांचा मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अजूनतरी समोर आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com