Sadabhau Khot Jobs : 'फुकट धान्य नव्हे, रोजगार द्या'; सदाभाऊ खोतांचा सरकारला स्पष्ट संदेश, कर्जमाफीवरही मोठं विधान

Sadabhau Khot urges Maharashtra government to prioritize jobs over free schemes : अभियंता तरुणांना उद्योगासाठी कर्ज मिळत नसल्याची खंत; विरोधकांवरही साधला निशाणा.
Sadabhau Khot Jobs
Sadabhau Khot JobsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्य सरकारने केवळ मोफत धान्य आणि विविध अनुदान योजनांवर भर न देता रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका महायुतीतील विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडली.

"फुकट धान्य द्यायचं, अनुदान द्यायचं हे कायमचं सुरू राहू शकत नाही. हाताला काम देणाऱ्या योजना आणणं आता आवश्यक आहे," असे ते म्हणाले.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी रोजगार, उद्योग, कर्जमाफी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले.

देशात अनेक तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करूनही उद्योग सुरू करू शकत नसल्याची खंत व्यक्त करत खोत (Sadahbhu Khot) म्हणाले, "आमची मुलं इंजिनिअर झाली आहेत. त्यांना उद्योग सुरू करायचा आहे; पण बँका (Bank) तारण मागतात. तारण आणायचं कुठून? हातात डिग्री असूनही उद्योग करता येत नसेल, तर अशा डिग्रीचा उपयोग काय?"

Sadabhau Khot Jobs
Ravi Rana BJP Ticket Claim : "रविराज देशमुखांचे तिकीट मीच कापले"; रवी राणा यांच्या दाव्यावर भाजपचा पलटवार, 'हे पूर्णपणे खोटे'

याच संदर्भात त्यांनी, "देशात जगणं स्वस्त झालंय आणि मरणं महाग झालंय. हे का घडत आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे," असेही मत व्यक्त केले.

Sadabhau Khot Jobs
Livestock Insurance Scheme : 8 वर्षांनंतर राज्यात 'पशुधन विमा योजना' पुन्हा सुरू; आमदार खताळांचा पाठपुरावा, गाई, म्हशींसह शेळी-मेंढ्यांनाही मिळणार संरक्षण

महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत खोत म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे सरकारची जबाबदारी आहे. त्यांच्या मते, कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून शेतीसाठी पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण रोजगाराला चालना देणारी धोरणे राबविणे अधिक गरजेचे आहे.

विरोधकांवरही टीका

विरोधकांवर निशाणा साधताना खोत म्हणाले, "त्यांच्या सरकारच्या काळात किती मोठी कर्जमाफी झाली, याचा आधी लेखाजोखा द्यावा. सध्याचे विरोधक समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी निरर्थक विषयांवर चर्चा करण्यात व्यस्त आहेत. सरकारच्या चुका दाखवून दिशादर्शक भूमिका घेणे हे विरोधकांचे काम आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com