Ravi Rana BJP Ticket Claim : "रविराज देशमुखांचे तिकीट मीच कापले"; रवी राणा यांच्या दाव्यावर भाजपचा पलटवार, 'हे पूर्णपणे खोटे'

BJP rejects Ravi Rana claim on Raviraj Deshmukh ticket, says only Parliamentary Board decides candidature : रविराज देशमुख यांच्या उमेदवारीबाबत रवी राणा यांच्या दाव्यानंतर भाजपची तातडीची भूमिका; राजेश वानखडे, प्रताप अडसड आणि प्रवीण पोटे यांचा स्पष्ट दावा, तिकीट वाटपाचा निर्णय फक्त संसदीय मंडळाचाच.
Ravi Rana BJP Ticket Claim
Ravi Rana BJP Ticket ClaimSarkarnama
Published on
Updated on

Amravati Politics : आमदार रवी राणा यांनी "रविराज देशमुख यांचे आमदारकीचे तिकीट कापण्याचे काम मीच केले" असा दावा केल्यानंतर अमरावतीच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राणा यांच्या या विधानानंतर भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या दाव्याला ठाम शब्दांत फेटाळून लावले.

पक्षाच्या तिकीट वाटपाचा निर्णय केवळ भाजपच्या संसदीय मंडळाकडून (Parliamentary Board) घेतला जातो. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने अशा प्रकारचा दावा करणे चुकीचे असून तो पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

भाजपचे तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड आणि आमदार प्रवीण पोटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत रवी राणा (Ravi Rana) यांच्या विधानावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. तिघांनीही एकमुखाने पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बाहेरील व्यक्तींनी भाष्य करू नये, असा इशारा दिला.

आमदार राजेश वानखडे म्हणाले, "भाजपमध्ये (BJP) कोणाला तिकीट द्यायचे किंवा कापायचे याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेते. आमच्या पक्षाबाबत बाहेरच्या व्यक्तींनी बोलू नये. कोणी असे दावे करत असेल, तर आम्ही सर्वजण एकत्रितपणे त्याला उत्तर देऊ."

Ravi Rana BJP Ticket Claim
Jyoti Waghmare Kutumbpramukh remark : उद्धव ठाकरेंनंतर आता मोदींसाठीही 'कुटुंबप्रमुख' शब्द; ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याची चर्चा

आमदार प्रताप अडसड यांनीही रवी राणा यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "भाजपमध्ये उमेदवारीबाबत अंतिम निर्णय संसदीय मंडळ घेते. 'मी अमुक व्यक्तीचे तिकीट कापले' असा दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. रवी राणा यांच्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाही. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद घेतली," असे त्यांनी स्पष्ट केले.

Ravi Rana BJP Ticket Claim
Wedding Rules : विवाह सोहळ्यांसाठी नवी आचारसंहिता; रात्री 10 नंतर DJ बंद, 11.30 पर्यंत लॉन्स रिकामे करणे बंधनकारक

आमदार प्रवीण पोटे यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार करत, "तिकीट कोणाला द्यायचे आणि कोणाचे कापायचे, हे संसदीय मंडळ ठरवते. बाहेरील व्यक्तीने या प्रक्रियेवर दावा करणे योग्य नाही. असा दावा पूर्णपणे खोटा असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे," असा घणाघात केला.

रवी राणा यांच्या विधानानंतर अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि रवी राणा यांच्यातील वाद आता उघडपणे समोर आला आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शाब्दिक संघर्षाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com