Sadashiv Lokhande : 'शिर्डीतून मीच लढणार!' मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच लोखंडेंनी ठोकला शड्डू

Ahmednagar Politics : मुख्यमंत्री शिंदे शिर्डीच्या दौऱ्यात सदाशिव लोखंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Eknath Shinde, Sadashiv LokhandeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Political News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचे गुऱ्हाळ अंतिम टप्प्यात आले आहे. शिर्डीबाबत मात्र अद्याप निर्णय होताना दिसत नाही. सीटिंग सीट या फार्म्युल्यानुसार ही जागा शिंदे गटाकडे आहे. मात्र, येथील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पक्षाअंतर्गतच विरोध वाढला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (ता. २७) शिर्डी दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच लोखंडेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. Sadashiv Lokhande

मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोखंडेंनी (Sadashiv Lokhande) शिर्डीत महायुतील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री शिंदे शिर्डीच्या दौऱ्यात सदाशिव लोखंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच लोखंडेंनी शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून पुन्हा मीच उमेदवार असणार आहे. दरम्यान, त्यांच्या नावाबद्दल नकारात्मक चर्चा होती. त्यानंतरही खासदार लोखंडेंनी शिर्डीत शंभर टक्के मीच उमेदवार असणार आहे, असे ठासून सांगितले. त्यामुळे शिवसेनेतील वादावर मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Raj Thackeray MNS : एकनाथ शिंदेंचा पत्ता कट, राज ठाकरे होणार शिवसेनेचे प्रमुख; काय आहे भाजपचा प्रस्ताव?

या वेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. ठाकरे गटाकडून शिर्डीसाठी भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या नावाची चर्चा आहे. लोखंडे म्हणाले, तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेला ठरवायचे आहे. त्यांची प्रशासकीय 32 वर्षे सर्व्हिस आहे तर माझी जनतेत आहे. त्यांच्यापेक्षा मी बरा आहे, असे म्हणत त्यांनी वाकचौरेंची खिल्ली उडवली.

Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Lok Sabha Election 2024 : "खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण, नाही तर...", शर्मिला पवारांचा सुळेंसाठी प्रचार

लोखंडेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत कुणाचेच काम केले नाही. आता शिर्डी दौऱ्यात त्यांनी माझा उल्लेख गद्दार म्हणून केला. एकेकाळी ज्यांना ते तूपचोर आणि गद्दार बोलले त्यांनाच आता ते उमेदवारी देत आहेत, याकडेही लोखंडेंनी लक्ष वेधले.

2014 आणि 2019 ला उद्धव ठाकरेंनी मदत केली. आता मी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहे. आता त्यांनीच मला कामाला लागा, असे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, मी 2014 ला पहिल्यांदा साखर सम्राटांना पराभूत करून निवडून आलो होतो. प्रस्थापितांशी काही मतभेत असू शकतात, मात्र आमच्यात वाद नाही. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होईल. आज सर्व माझ्यासोबत आहेत. तसेच महायुतीने कुणालाही तिकीट दिले तरी काम करू, असेही लोखंडेंनी या वेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Solapur Politics : मोठी घडामोड! तिकीट कापल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com