Solapur Politics : मोठी घडामोड! तिकीट कापल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक

MP Jay Siddheshwar Swami Meet Devendra Fadnavis : खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Jay Siddheshwar Swami - Devendra Fadnavis
Jay Siddheshwar Swami - Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशासह महाराष्ट्रातही लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे भाजप - काँग्रेसकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अजूनही रखडलं आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याने मित्रपक्षांची चांगलीच अडचण होत आहे, तर उमेदवारी जाहीर झालेल्या मतदारसंघातही सर्वच आलबेल नसून वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, आता एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.

सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं तिकीट यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कापण्यात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे सोलापूरमध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर भाजपने सोलापूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर शिंदे - सातपुते यांच्यात सोशल मीडियावर वॉर रंगले आहे. याचवेळी आता लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी हे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील 'सागर' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Jay Siddheshwar Swami - Devendra Fadnavis
Praniti Shinde Vs Ram Satpute : 'बाहेरचा उमेदवार' म्हणून डिवचणाऱ्या प्रणितींना सातपुतेंचं जशास तसं उत्तर...

खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची ही भेट असल्याने स्वामी नाराज आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे राम सातपुते (Ram Satpute) हे तिकीट मिळाल्यानंतर सोमवारी (ता.25) पहिल्यांदाच सोलापूरात दाखल झाले आहे. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले असतानाच याचदिवशी सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी थेट मुंबई गाठत थेट फडणवीसांची भेट घेतली आहे. यामुळे फडणवीसांच्या भेटीनंतर स्वामी आता काय भूमिका घेतात ते सातपुतेंचा प्रचार करणार का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

2019 च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे प्रकरण..?

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Jay Siddheshwar Swami) यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला समितीने अवैध ठरविला होता. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांच्या नावे दिलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्याचा पडताळणी समितीचा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला होता.

R

Jay Siddheshwar Swami - Devendra Fadnavis
Lok Sabha Election: सोलापुरात मोठा ट्विस्ट; भाजपच्या जवळ गेलेले आडम मास्तर आता काँग्रेसचा प्रचार करणार, पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com