Nagar Politics : शिंदेंचे खासदार सदाशिव लोखंडेंचा संताप, आता थेट गडकरींकडेच करणार तक्रार

Shinde Group MP Sadashiv Lokhande On Nagar Manmad Highway : शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा संताप झाला आहे, काय आहे कारण?...
Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
Nitin Gadkari, Sadashiv LokhandeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीवरून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. खासदार लोखंडे आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या मध्यस्थीने नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने तीन डिसेंबरचे वर्षश्राद्ध आंदोलन स्थगित केले आहे. निधी उपलब्ध असून, रस्ता होत नाही म्हणून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करू, अशी तंबी सदाशिव लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
BJP Arun Mundhe: माजी जिल्हाध्यक्षावर वाळूचोरीचा गुन्हा; भाजपने दिला थेट आंदोलनाचा इशारा

नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता दुरुस्ती कृती समितीने तीन डिसेंबरला 'वर्षश्राद्ध' आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या उपस्थितीत देवळाली प्रवरा नगरपालिकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी, रस्ता वाहतूक नियंत्रक अधिकारी, पोलिस निरीक्षक, ठेकेदार कंपनी आणि रस्ता दुरुस्ती समितीचे सदस्य यांची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच 'वर्षश्राद्ध' आंदोलन हे राजकीय पक्ष, नेते यांच्यासाठी नसून अधिकाऱ्यांसाठी होते, असे रस्ता दुरुस्ती समितीने स्पष्ट केले. तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2019 पासून पाठपुरावा सुरू आहे. अनेक आंदोलने झाली आहेत. या रस्त्यावर राहुरी परिसरात आतापर्यंत 45 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात शेकडो जण कायमचे जायबंदी झाले आहेत. अपघातात जायबंदी झालेले किंवा मृत्यू झालेल्या किती कुटुंबीयांना भेटी दिल्या? असा प्रश्न करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरकारने निधी उपलब्ध करत त्यांचे काम केले आहे. अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर योग्य करत नसल्यामुळे नगर शिर्डी रस्त्याचे काम थांबलेले आहे, असा संताप देवेंद्र लांबे यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला. (Ahmednagar Politics News )

'रस्ता दुरुस्ती कृती समितीची भूमिका ऐकल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. निधी उपलब्ध होऊनदेखील तुमच्याकडून काम होत नसेल तर आपल्या विरोधात मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली जाईल. रस्ता अपघाताचा प्रश्न गंभीर असून, मी स्वतः या रस्त्याने प्रवास करतो. रस्त्याची वस्तुस्थिती जाणून आहे. रस्त्याला सरकारकडून निधी उपलब्ध होऊनदेखील ठेकेदार वेळेत कामे करत नसतील, तर त्यांच्यावर कारवाईचा अधिकार तुमच्याकडे आहे', असे अधिकाऱ्यांना खासदार लोखंडेंनी सुनावले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी रस्ता दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराला काम चालू करण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंतु आंदोलकांच्या मागणीचा विचारात घेता प्रथम प्राधान्य म्हणून विळद घाट ते सावळीविहीरपर्यंतची एकेरी वाहतूक आहे, त्या ठिकाणी तत्काळ दुहेरी वाहतूक चालू करण्यासाठी काम चालू केले जाईल. त्यात प्रथम प्राधान्य म्हणून राहुरीतील जोगेश्वरी आखाडा सूतगिरणीसमोर रस्त्याचे काम तत्काळ चालू करून ते 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून देण्यात येईल, असे सांगितले.

...तर अधिकाऱ्यांचे फोटो लावून 'वर्षश्राद्ध'

कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांच्या आश्वासनावर कृती समितीच्या सदस्यांनी सहमती न दाखवल्याने बैठकीत तणावाचे वातावरण तयार झाले होते. चंद्रशेखर कदम यांनी हस्तक्षेप केला. यानंतर कृती समितीने 3 डिसेंबरचे 'वर्षश्राद्ध' आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 10 डिसेंबरपर्यंत राहुरीतील जोगेश्वरी आखाडा परिसरातील दुहेरी रस्त्याचे काम न झाल्यास सर्व अधिकाऱ्यांचे 'वर्षश्राद्ध'चे फोटो असलेले बोर्ड नगर ते शिर्डीपर्यंत लावू. तसेच 15 डिसेंबरला अधिकाऱ्यांचे 'वर्षश्राद्ध' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वसंत कदम यांनी दिला. शिवाजी कपाळे, गणेश भांड, संपत जाधव, अण्णासाहेब , बाळासाहेब कदम, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस निरीक्षक गुलाब पाटील, लोणीचे सहायक निरीक्षक युवराज आठरे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे उपस्थित होते.

Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
Nagar Politics : राठोडांची विखेंवर जहरी टीका; 'नगर दक्षिणचं दिवाळं काढणाऱ्यांना जनता लोकसभेला चोख हिशेब देईल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com