BJP Arun Mundhe: माजी जिल्हाध्यक्षावर वाळूचोरीचा गुन्हा; भाजपने दिला थेट आंदोलनाचा इशारा

Shevgaon Politics: ...तर राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा भाजपचा आरोप
Shevgaon BJP
Shevgaon BJPSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू शासकीय ठेकेदार उदय मुंढे यांच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक व तालुक्याच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून कुठलीही शहानिशा न करता खोटा वाळूचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानेच हा खोटा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सखोल पारदर्शीपणे चौकशी करावी, हा खोटा गुन्हा तातडीने रद्द करून ताे गुन्हा दाखल करण्यास सहभागी असलेल्या अधिकारी व संबंधित व्यक्तीविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा भाजप जिल्हाभर आंदोलने करेल, असा इशारा भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश चिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्या विरोधात शेवगाव तहसीलदार यांच्या कार्यालयामार्फत वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निषेधार्थ जिल्हा, नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

या वेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाळासाहेब सोनवणे, श्याम पिंपळे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, मनोज कुलकर्णी, बाळासाहेब महाडिक, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shevgaon BJP
Nagar Politics : राठोडांची विखेंवर जहरी टीका; 'नगर दक्षिणचं दिवाळं काढणाऱ्यांना जनता लोकसभेला चोख हिशेब देईल'

दिलीप भालसिंग म्हणाले, "23 नोव्हेंबरला गावातील सरपंच वाळू नसल्याची तक्रार करतात. त्यानंतर 30 नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पंचनामा करून वाळू आहे, त्याच ठिकाणी असल्याचे सांगून वाळू सरपंचांच्या ताब्यात दिली जाते.

असे असतानाही अरुण व उदय मुंढे यांच्यावर महसूल खात्याचे अधिकारी वाळूचोरीचा खोटा गुन्हा दाखल करतात. पोलिसांनी दिलेल्या दम व दबावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलेला दिसतो. राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे सर्व केलेले आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे, हे जनतेपुढे येणे आवश्यक आहे".

"त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंढे बंधूंवरील गुन्हा मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या खोट्या गुन्ह्याची माहिती आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावरही घालणार आहोत.

पक्षाच कोणताही पदाधिकारी एकटा नाही, पूर्ण संघटना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जर अशा खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले, तर आम्ही ते सहन करणार नाही," असा इशारा दिलीप भालसिंग यांनी दिला.

दरम्यान, विवेक नाईक, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, दादा बोठे, शरद बारस्कर, अरविंद कारंजकर, रियाज कुरेशी, कदीर शेख, गणेश भालसिंग, विद्या शिंदी, अर्चना चौधरी, विजया अल्हाटे उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी या प्रकारातील सबंधित अधिकाऱ्यंना बोलावून सखोल चौकशी करू, असे आश्वसन भाजपच्या शिष्ठमंडळास दिले.

(Edited By - Ganesh Thombare)

Shevgaon BJP
Gaikar Vs Padalkar : गोपीचंद पडळकरांचे बोलवते धनी कोण? हे मराठा समाजाला चांगलंच ठाऊक - करण गायकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com