

Jamkhed crime news : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याची प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे इथल्या ससूर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्यावर हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या अजून त्याच्या शरीरात असल्याचे समोर येत आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे. दरम्यान, मोहोळकर याच्या राक्षसी ताकदीची चर्चा रंगली आहे. या चर्चा फक्त मिथक आहेत की, खरंच आहेत की, अन्य काही! पण त्या रंगल्या आहेत.
सागर मोहोळकर हा नाशिक (Nashik) कारागृहातून महिन्याभरापूर्वी जामिनावर बाहेर आला होता. शारीरिक ताकदीचा तो अमानुषपणे वापर करायचा. हल्ल्याच्या पूर्वी त्याने मद्यप्राशन केलं होतं. त्याचे समोरच्याचे पैसे देखील दिले नसल्याचे समजते. अर्थात तशी चर्चा आहे.
मोहोळकर याच्यावर हल्ले करणारा दोन दुचाकीवरून आले होते. ते तिघे होते. त्यांनी मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यासाठी दोन गावठी पिस्तुलांचा वापर झाल्याचे समजते. यातील सहा पैकी चार ते पाच गोळ्या मोहोळकर याला लागल्याचे समजते. यात दोन गोळ्या तोंडावर लागल्यात तर, तिसरी गोळी डोळ्यावर आली.
तोंडात झाडलेल्या गोळ्यापैंकी एक गोळी जखमी अवस्थेत असतानाच मोहोळकर तोंडात हात घालून काढत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून त्याच्या राक्षसी ताकदीच्या मिथकांना जामखेडसह महाराष्ट्रातील अंडरवर्ल्डमध्ये (Crime) चर्चांना उधाण आलं आहे.
मोहोळकर याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून इथं उपचार सुरू आहे. सुरवातीला त्याच्यावर जामखेड इथल्या खासगी रुग्णालयात उपचार झाले. तिथं देखील जखमी अवस्थेत असलेल्या मोहोळकर त्याची राक्षसी ताकद दाखवत होता. मोठ-मोठ्याने ओरडत होता. यानंतर त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून त्याला पुढे पुणे इथल्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर शरीरात अजून दोन गोळ्या असल्याची पोलिस अधिकाऱ्यांच्या वर्तुळातील सूत्रांनी माहिती दिली. मोहोळकर याची राक्षसी ताकदीचे चर्चांना बळ मिळते, ते पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला कानशिलात लावण्याच्या प्रकाराने!
मोहोळकर याने घायवळ याच्या कानशिलात सोलापूर इथल्या एका गावच्या यात्रेत लगावली. त्यानंतर मोहोळकर चर्चेत आला. पण मोहोळकर याने पुढे सहा महिन्यांनी घायवळ याच्याशी तडजोड करत माफी मागितली होती. पण यानंतर मोहोळकर याची राक्षसी डेअरींग वाढत गेली. एखाद्याच्या कानशिलात लगवायची ठरवल्यावर, तो मागेपुढे पाहात नसायचा, असेही त्याच्याविषयी सांगितले जाते.
मोहोळकर याच्याविरोधात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. इतर गंभीर गुन्ह्यांची यादी मोठी आहे. पोलिसांवर देखील तो गुरगुरायचा. त्याता काबूत ठेवण्याचे एक-दोन पोलिसांचे काम नसायचे. त्याला दहा-बारा पोलिसांची ताकद लागयाची. त्याच्या राक्षसी ताकदीसमोर पोलिस देखील थरथरायचे, असे सांगितले जाते.
अशा कुख्यात मोहोळकरचे अनेक दुश्मन होते. त्याच्यावर नेमका कोणी हल्ला केला? कशातून हल्ला केला? हल्लेखोर नेमके कोण? अन् कोठे गेलेत? असे अनेक प्रश्न आहेत. बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्याला आज चार दिवस झाले आहेत. पण त्याच्यावर हल्लेखोरांना पकडण्यात अहिल्यानगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या चार पथकांना अजून यश आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.