Shirdi Sai Baba News : साई संस्थानचा महत्वाचा निर्णय; साई भक्तांना आता मिळणार मोठा दिलासा

Sai Baba Shirdi : फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
Shirdi Sai Baba News
Shirdi Sai Baba News Sarkarnama

Ahmednagar News : शिर्डी येथील साई भक्तांसाठी साई संस्थानच्या समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी साईमंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी लवकरच हटवली जाणार आहे.

कोरोनाच्या काळात साईमंदिरमध्ये हार, फुलं, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ही बंदी अद्यापही कायम आहे. त्यामुळे ही बंदी उठवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर साई संस्थानच्या समितीने याबाबत महत्वाचा निर्णय घेत ही बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे.

Shirdi Sai Baba News
BRS Rally News : भाजप-शिवसेनेचे आमदार संपर्कात, नगरसेवकांसह तीनशे जणांचा होणार पक्षप्रवेश..

समितीच्या निर्णयानंतर आता याबाबत न्यायालयाच्या मान्यतेसाठी साई संस्थानकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेनंतर ही बंदी उठणार असून शिर्डी परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Shirdi Sai Baba News
Atique Ahmed News : अतिक-अशरफ खूनप्रकरण : शूटर्स तीन नव्हे, तर पाच होते; त्या दोघांवर होती ही विशेष जबाबदारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही बंदी उठवण्यात यावी, यासाठी साई मंदिर परिसरात शेतकरी आणि काही व्यावसायिकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. आता या समितीच्या अहवालानुसार ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com