Atique Ahmed News : अतिक-अशरफ खूनप्रकरण : शूटर्स तीन नव्हे, तर पाच होते; त्या दोघांवर होती ही विशेष जबाबदारी

अतिकची हत्या करणारे तीन शूटर प्रयागराज रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
Atique Ahmed Murder Case
Atique Ahmed Murder Case Sarkarnama
Published on
Updated on

लखनऊ : पोलिसांचा (Police) बंदोबस्त असूनही गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचा गोळ्या (Firing) झाडून खून करण्यात आला. आता या खून प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांचे खूनप्रकरण घडविण्यात तीन नव्हे; तर पाच शूटर्सचा सहभाग होता. (Atique-Ashraf Ahmed murder case: The shooters were not three but five)

अतिक-अशरफ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. बॅकअपसाठी दोन शूटर्सची टीम ठेवण्यात आली होती. हे तीन शूटर्स काम पूर्ण करू शकले नाहीत, तर दोघांची बॅकअप टीम ही अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडून आपले काम पूर्ण करेल. तीन शूटर्सने अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला आणि संधीचा फायदा घेत दोन्ही बॅकअप शूटर पळून गेले.

Atique Ahmed Murder Case
Sharad Pawar News : मे महिन्यात अनेक राजकीय गुपितं उलगडणार : पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ भाग दोनचे होणार प्रकाशन

सीसीटीव्ही पोलिसांनी घेतले ताब्यात

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांची एसआयटीची टीम या दोन शूटर्सचा शोध घेत आहे. कोल्विन हॉस्पिटलच्या बाहेर लावलेले सर्व सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र, पोलिसांनी हे सर्व सीसीटीव्ही तपासले की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण एवढेच स्पष्ट होते की, हे शूटर तिथे हजर होते, तर सीसीटीव्ही तपासले, तर बॅकअप शूटर्सशी संबंधित काही सुगावा नक्कीच सापडेल.

एसआयटीला मोठे यश मिळाले

अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात एसआयटी टीमला मोठे यश मिळाले आहे. शूटर्स ज्या हॉटेलमध्ये उतरले हेाते, त्या हॉटेलमध्ये एसआयटीचे पथक पोहोचले आहे. अतिक-अशरफ यांचा खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी रेकी केली होती. अतिकची हत्या करणारे तीन शूटर प्रयागराज रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

Atique Ahmed Murder Case
Atique Ahmed Murder Case: अतिक-अश्रफ खूनप्रकरणी पाच पोलिस निलंबित; ‘किती दिवस छोटे-मोठे शूटर्स राहायचे?’ हल्लेखोरांचा पोलिसांना उलटा सवाल

एक एक जण जाऊन रेकी करत होते

हे तीनही शूटर १३ एप्रिल रोजी रात्री साडेवाजता हॉटेलमध्ये पोहोचले आणि रूम क्रमांक २०३ मध्ये एकत्र राहिले होते. अतिक आणि अशरफ यांचा खून करण्यापूर्वी एक एक जण रेकी करून येत होता. एक मारेकरी रेकी करायला गेला, की बाकीचे दोघे खोलीत राहायचे. हॉटेल व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, पोलिस १६ एप्रिल रोजी सकाळी हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी हॉटेलचे रजिस्टर आणि डीव्हीआर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढून घेतले होते.

Atique Ahmed Murder Case
Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

जुन्या क्रमांकाच्या माध्यमातून संपर्काची माहिती घेणार

अतिक खून प्रकरणाच्या तपासाला एसआयटीने वेग दिला आहे. पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्या आधारे पोलिसांचा तपास पुढे जाणार आहे. जप्त केलेल्या दोन्ही फोनमध्ये सीमकार्ड नाहीत. सध्या एसआयटी दोन्ही मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करणार असून डेटा रिकव्हरीही केली जाणार आहे. त्याचबरोबर एसआयटीला आरोपींचे जुने क्रमांकही मिळाले आहेत. आता या जुन्या क्रमांकाच्या माध्यमातून त्याचा पूर्वी कोणाशी संपर्क होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुन्या क्रमांकाचा सीडीआर काढला जात आहे. एसआयटी आजही तीनही आरोपींची चौकशी करणार असून ही चौकशी उद्या संध्याकाळी पाचपर्यंत सुरू राहू शकते. आधी तीनही आरोपींना वेगळे बसवून नंतर एकत्र बसवून चौकशी केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com