Salim Kutta Case: बडगुजरांची भेट कुठे झाली? सलीम कुत्ताला नाशिक पोलिस घेणार फैलावर

Sudhakar Nadgujar News: चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल सरकारकडे पाठविणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Salim Kutta Case
Salim Kutta CaseSarkarnama
Published on
Updated on

Salim Kutta Case : ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बडगुजर प्रकरणात नाशिक पोलिसांचा तपास प्रगती पथावर आहे.

बडगुजरांची दोन दिवसापासून चौकशी सुरु असून आज (रविवारी) सलग तिसऱ्या दिवशीही पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. चौकशीत मोठी अपडेट समोर येत आहे.बडगुजर-सलीम कुत्ता यांच्या भेटीचा अधिक तपशील पोलिसांना हवा आहे. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Salim Kutta Case
Manoj Jarange: मराठा आंदोलनाची आज दिशा ठरणार; अंतरवाली सराटीत स्वयंसेवक, आरक्षण तज्ज्ञ एकत्र...

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक पुणे येथील येरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ता याचा घेणार जबाब असल्याची माहिती समोर आली आहे. सुधाकर बडगुजर प्रकरणी नाशिक पोलिसांचा नाशिक मध्यवर्ती कारागृहासोबत पत्र व्यवहार केला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासमवेत पार्टीमध्ये नाचतानाच्या व्हिडिओसंदर्भात ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरु आहे. बडगुजर यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल सरकारकडे पाठविणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या पार्टीच्या चित्रफिती शिवसेना शिंदे गटाने उघड केल्यानंतर या पार्टीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात आले. त्यामुळे सुधाकर बडगुजर हे नाव सर्वांच्या तोंडी आले आहे.

Salim Kutta Case
CM Mohan Yadav: मुख्यमंत्री यादव योगींच्या वाटेवर: घेतले तीन मोठे निर्णय, मध्य प्रदेशातही 'बुलडोझर' राज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com