Manoj Jarange: मराठा आंदोलनाची आज दिशा ठरणार; अंतरवाली सराटीत स्वयंसेवक, आरक्षण तज्ज्ञ एकत्र...

Maratha Reservation: अल्टीमेटमची मुदत संपण्यास सात दिवस बाकी
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News: राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टीमेटमची मुदत संपण्यास सात दिवस बाकी आहे. आरक्षणाच्या पुढील दिशा ठरविण्यासाठी जरांगेंनी आज मराठा समाजासोबत बैठक बोलवली आहे. अंतरवाली सराटी येथे आज दुपारी बैठक होत आहे. जरांगे बैठकीत काय निर्णय घेणर, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

राज्यभरातील स्वयंसेवक, सभांचे आयोजक, वकील, डॉक्टर आणि आरक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी बैठकीला उपस्थित राहणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणीच ही बैठक होत आहे.

Manoj Jarange Patil
CM Mohan Yadav: मुख्यमंत्री यादव योगींच्या वाटेवर: घेतले तीन मोठे निर्णय, मध्य प्रदेशातही 'बुलडोझर' राज

आज होत असलेल्या बैठकीपूर्वी सरकारने केलेल्या कामाची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी काल (शनिवारी) केली होती. त्यांनंतर शनिवारी रात्री सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भूमरे यांनी त्यांची भेट घेतली. मीडिया समोरच तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधाने मोठी अपडेट दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) सोमवारी सभागृहात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती देणार आहेत. त्यामुळे येत्या काळात आंदोलनाचा निर्णय घेऊ नये. 24 तारखेच्या अल्टिमेटमवर विचार करा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. त्यावर जरांगे पाटलांनी रविवारच्या समाजाच्या बैठकीत चर्चा करु, असे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाजन म्हणाले, "सरकारकडे क्युरेटिव्ह पिटीशन आणि मागासवर्ग आयोग असे दोन पर्याय आहेत, टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ लागेल," त्यावर सरकारने लेखी स्वरूपात दिलेल्या सर्व गोष्टी पाळल्या तर वेळ वाढवून देण्याची गरजच लागणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे.

सध्या जरांगे आणि भुजबळ वाद पेटला आहे.दोन्ही नेत्यांनी शब्दाला शब्द वाढवू नये असे आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. तर भुजबळ विनाकारण गावोगावी आंदोलनं घेत वाद वाढवत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. "मी दोन्ही नेत्यांना शांतता ठेवावी, अशी विनंती केली आहे. आरक्षणासाठी शासन हे कटिबद्ध आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले.

Manoj Jarange Patil
Nagpur Winter session: चव्हाण PMO कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही? जयकुमार गोरे कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com