Chhagan Bhujbal On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा; छगन भुजबळांची मोठी मागणी

Sambhaji Bhide Should be Arrest for sedition : भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वाद सुरू
Chhagan Bhujbal, Sambhaji bhide
Chhagan Bhujbal, Sambhaji bhideSarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Bhide News : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राज्यासह देशात चर्चा होत आहे. भिडे १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही, यादिवशी देशाची फाळणी झाली होती. तो काळा दिवस आहे, असे म्हणाले. भिडेंच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

या वक्तव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर राज्यातून टीका होत आहे. भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली. तसेच त्यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, "संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर भिडे आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करायला पाहिजे."

Chhagan Bhujbal, Sambhaji bhide
Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंविरोधात कारवाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा

छगन भुजबळ यांनी यावेळी राज्य सरकारवरही निशाणा साधला. भुजबळ म्हणाले की, "भिडेंनी सांगितले की १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज नाही. तसेच त्यांनी जन गण मन हे राष्ट्रगीतही नाही. आता एवढे जर दुसरे कुणी म्हटले असते त्याला आतापर्यंत देशद्रोहाच्या गुन्हाअंतर्गत अटकही केली असती. भिडेंना मात्र होत नाही. मनोहर भिडे नेहमी वाटेल ते बडबडत असतात. आता मनोहर असलेले नाव सोडून संभाजी म्हणवून घ्यायचे. बहुजनांच्या मुलांना फितवण्याचे ते काम करत असतात."

Chhagan Bhujbal, Sambhaji bhide
Milk Adulteration News: दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता थेट...

भिडे काय म्हणाले होते ?

पुण्यातील दिघी येथे रविवारी (दि. २५) संभाजी भिडे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, "जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली. यादिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com