Pravin Gaikwad Ink Attack: प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याला संभाजी ब्रिगेड आता वेगळ्या पद्धतीने देणार उत्तर, नेत्यांनी दिला हा इशारा...

Sambhaji Brigade's Tactical Response to Pravin Gaikwad Ink Incident: संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांचा कट असल्याचा आरोप.
Pravin Gaikwad ink attack response
Pravin Gaikwad ink attack responseSarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Brigade Retaliation Plan: संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला. हा हल्ला करणारा सत्ताधारी पक्षाचा समर्थक आहे. त्याला तेवढ्याच तीव्रतेने उत्तर दिले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

धुळे शहरातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या घटनेनंतर आक्रमक झाले. राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष या घटनेला जबाबदार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या काय प्रतिक्रिया उमटतात याची चाचणी घेण्यासाठी हा हल्ला घडविण्यात आला, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. दीपक काटे याचा शिवधर्म प्रतिष्ठान या नावाशी किंवा विचाराशी काडीचाही संबंध नाही. गुंड आणि विकृत प्रवृत्तीच्या दीपक काटे याने हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून केला, याचा देखील तपास करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Pravin Gaikwad ink attack response
Hemant Godse Politics: माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, एकटे एकनाथ शिंदे काय काय करणार?, मंत्र्यांवर मात्र घसरले...

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख हेमंत भडक, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख नाना कदम, सचिव महेश पाटील, समन्वयक अमर फरताळे, नंदू अहिरराव, दिनकर जाधव, शहराध्यक्ष भूषण बागुल, श्रीकृष्ण बेडसे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमले होते. वेळी प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. दीपक काटे आणि कथीत शिवधर्म प्रतिष्ठानचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. घोषणांमुळे परिसरात वातावरण चांगलेच तापले होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांनी यापुढे केवळ दूरचित्रवाणीवर निषेध व्यक्त करून भागणार नाही. प्रवीण गायकवाड यांनी महाराष्ट्रात बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या विचारांचा प्रसार गायकवाड करीत आहेत. त्याचा बुरसटलेल्या सनातनी प्रवृत्तींना राग आहे.

अशा प्रवृत्तींना तेवढ्याच तीव्रतेने उत्तर देण्याची आवश्यकता आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ला हा नथुरामी प्रवृत्तीचा शेवट ठरला पाहिजे. त्यासाठी संभाजी ब्रिगेड यापुढे केवळ निषेध व्यक्त न करता तेवढ्याच धारिष्ट्याने डोळ्यात डोळे घालून संबंधित विकृतींना उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

या निमित्ताने प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या प्रतिक्रिया धुळे शहरात आणि जिल्ह्यातही उमटलेल्या दिसल्या. जिल्ह्याच्या विविध भागात यासंदर्भात निषेध करण्यात आला. राज्य शासनाने आणि पोलीस यंत्रणेने हल्लेखोरांचा मूळ हेतू शोधून काढावा. केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. असे झाल्यास संभाजी ब्रिगेड अधिक आक्रमक होईल असा संदेश संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकाऱ्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com