Hemant Godse Politics: माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, एकटे एकनाथ शिंदे काय काय करणार?, मंत्र्यांवर मात्र घसरले...

Hemant Godse; Former MP from Shiv Sena Eknath Shinde's party, Hemant Godse, praised the BJP-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले माजी खासदार हेमंत गोडसे म्हणतात, मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, मात्र...
Dada Bhusem Eknath shinde & Hemant Godse
Dada Bhusem Eknath shinde & Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Hemant Godse News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजप पक्षात जाणार अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांनी भाजप प्रवेशाचा सध्यातरी कोणताही विषय नाही. मात्र पक्षातील मंत्र्यांवर मात्र आपली नाराजी असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.

माजी खासदार हेमंत गोडसे भाजप पक्षात जाणार, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री गोडसे यांनी अतिशय सूचक विधान केले आहे. आपण पक्षश्रेष्ठी अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज नाही, मात्र पक्षात पदाधिकारी आणि संघटनात्मक यंत्रणा नाही हे आपली खंत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षित कामे होत नाहीत.

महायुतीतील अन्य पक्षांकडे संघटनात्मक यंत्रणा कार्यक्षमपणे काम करते. विशेषतः भारतीय जनता पक्षात विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी त्या त्या पातळीवर कार्यकर्त्यांचे प्रश्न लगेचच सोडवितात. मंत्री देखील त्याची दखल घेतात.

Dada Bhusem Eknath shinde & Hemant Godse
Dada Bhuse Politics: हिंदूत्ववादी मंत्री दादा भुसे यांना गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील अवैध कत्तलखाने कसे दिसले नाही?

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री मात्र अपेक्षित कामे करताना दिसत नाहीत. पक्षाने मंत्र्यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामे करण्यासाठी नेमकेपणाने सूचना करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात तसे नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये विस्कळीतपणा येतो. याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे, असे माजी खासदार गोडसे म्हणाले

सुचक शब्दात नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र स्तुती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक प्रश्नांमध्ये व्यक्तिशः लक्ष घालतात. नेत्यांशी थेट संपर्क करतात. मात्र एकटे एकनाथ शिंदे काय काय कामे करणार? असा प्रश्न करून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि मंत्र्यांना थेट सूचना केल्या पाहिजेत, असे सूचक विधान त्यांनी केले.

माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दादा भुसे हे नाशिकचे नव्हे तर धुळ्याचे मंत्री आहेत, असे गमतीशीर विधान देखील केले. या निमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील नाशिकच्या गटबाजीवर त्यांनी अप्रत्यक्षरित्या हल्ला केला. त्याचवेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेणे टाळले. आपण राज्यातील सर्वच मंत्र्यांविषयी बोलत आहोत, असे सांगायला ते विसरले नाही.

गेले काही दिवस माजी खासदार गोडसे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात फिरत होती. त्याबाबत आपला असा कोणताही विचार सध्या तरी नाही, असे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्याचवेळी पक्षातील गटबाजीचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सर्व काही सुरळीत नाही असा संदेश यानिमित्ताने गेला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com