Sameer Bhujbal Politics: माजी खासदार समीर भुजबळ नांदगावचे सर्वात श्रीमंत उमेदवार, एवढी आहे मालमत्ता...

MP Sameer Bhujbal Declared as Richest Candidate from Nandgaon: नांदगाव मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत माजी खासदार समीर भुजबळ आहेत, सर्वात श्रीमंत उमेदवार.
Sameer Bhujbal
Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Sameer Bhujbal Net Worth: माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी आपल्या मालमत्ता आणि विविध गुन्ह्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

माजी खासदार भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मुंबई शाखेच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ते अपक्ष उमेदवारी करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी आपल्यावरील खटले आणि विविध मालमत्ता व देणे यांचा तपशील सादर केला आहे.

या तपशिलानुसार आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये ते सर्वात श्रीमंत उमेदवार असावेत अशी स्थिती आहे. माजी खासदार भुजबळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे विविध बँकांमध्ये ९.४५ आणि पत्नी शेफाली यांच्या खात्यात ३२.१३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

पत्नी शेफाली यांच्याक़डे 2.56 कोटींच्या तर समीर यांच्याकडे 3.54 कोटींचे बॉडस्, समभाग आणि अन्य गुंतवणूक आहे. या दोघांकडेही 73 लाख रुपयांची बचत प्रमाणपत्र आहेत. माजी खासदार भुजबळ यांच्यावर 12.66 कोटी तर पत्नी शेफाली यांनी 69.25 लाखांचे कर्ज घेतले आहे.

Sameer Bhujbal
Suhas Kande: महायुतीत वाद पेटला; आमदार कांदेंचा भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले,'मला पैशाच्या ऑफर, धमक्या...

मंत्री छगन भुजबळ यांचे ते पुतने आहेत. विशेष म्हणजे या दोघांकडेही कोणतेही वाहन नाही. माजी खासदार भुजबळ यांच्याकडे दहा तोळे आणि पत्नी शेफाली यांच्याकडे 50 तोळे सोने आहे. त्यांचे एकत्रित मूल्य ४३.२० लाख रुपये आहे.

माजी खासदार भुजबळ यांच्याकडे शेती देखील आहे. त्यात द्राक्ष बाग आहे. त्याचे मूल्य 20.90 लाख रुपये आहे. माजी खासदार भुजबळ यांच्याकडे 4.66 लाखांचे आणि पत्नी शेफाली यांच्याकडे 1.63 लाखांचे कार्यालयीन संगणक आणि साहित्य आहे. या सगळ्यांचे एकत्रित मूल्य सुमारे 21 कोटी रुपये आहे.

माजी खासदार भुजबळ यांच्याकडे नाशिक शहरात 4. 56 कोटी रुपये मूल्यांकन असलेली एक एकर जमीन आहे. त्यांच्याकडे नाशिक, मुळशी (पुणे) येथेही जमीन आहे. सिडको येथे बंगला, पुणे येथे सदनिका, भायखळा येथे क्रॉफर्ड मार्केट मध्ये गाळा तसेच भायखळा, सिडको आणि पुणे येथे त्यांच्या मालमत्ता आहेत.

Sameer Bhujbal
Sameer Bhujbal : समीर भुजबळ यांचे बंड; सुहास कांदे यांची निवडणूक झाली अवघड?

माजी खासदार भुजबळ यांच्याकडे विविध संस्था आणि बँकांची 15.47 कोटी रुपयांची देणी आहेत. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचा एक खटला प्रलंबित आहे. त्यात या विभागाकडे 27.31 लाख रुपये अनामत जमा आहे.

इंजिनिअरिंग शाखेची पदविका प्राप्त केलेल्या माजी खासदार समीर भुजबळ यांची एकूण मालमत्ता 55 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांत ते सर्वाधिक श्रीमंत म्हणून गणले जाऊ शकतात.

माजी खासदार भुजबळ यांच्या विरोधात ईडी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा प्रत्येकी एक खटला दाखल आहे. याशिवाय त्यांच्यावर मालेगाव छावनी, सांताक्रुज आदी पोलीस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com