Chhagan Bhujbal : काकांकडून पुतण्याचं कौतुक, म्हणाले समीर एकटाच लढला तरी एवढी मतं...

Chhagan Bhujbal Appreciates Sameer Bhujbal’s Performance Nandgaon Election : मी आणि पंकज भुजबळ यांनी नांदगावात यायचे नाही असे समीरने आम्हाला सांगितले होते. आम्ही कोणीही नांदगावात गेलो नाही तरीही समीरने चांगली मतं घेतली हे भूषणावह असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
Chhagan bhujbal sameer Bhujbal
Chhagan bhujbal sameer Bhujbal sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ हे पक्षाचा राजीनामा देऊन एकटेच लढले. त्यांचा मागे पक्ष नव्हता. चिन्ह नव्हतं. मी किंवा पंकज भुजबळ दोघांपैकी कोणीही नांदगावात गेलो नाही. तरीही समीर भुजबळांनी ५० हजार मतं घेतली हे भूषणावह असल्याचे छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ हे येवल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी आणि पंकज भुजबळ यांनी नांदगावात यायचे नाही असे समीरने आम्हाला सांगितले होते. आम्ही कोणीही नांदगावात गेलो नाही तरीही समीरने चांगली मतं घेतली. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अनेक ठिकाणी राजीनामा न देता लोक लढले होते. त्यातील काही निवडून आले, अन् काही पराभूत देखील झाले. निवडणूक लढवायची असेल तर राजीनामा द्या असे अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आणि मग निवडणूक लढवली.

Chhagan bhujbal sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यावर १२ वर्ष कुणाशी बोललो नाही पण..; भुजबळांनी सांगितला शिवसेना फुटीचा जुना किस्सा

दरम्यान समीर भुजबळांनी काल माध्यमांशी बोलताना आपण राजीनामा दिला पण अजित पवारांनी तो स्विकारला नसल्याने आपण पक्षातच असल्याचे म्हटले होते. त्यावर भुजबळांना विचारले असता त्यांनीही समीर भुजबळांनी दिलेला राजीनामा स्विकारला गेला नसल्याचं म्हटलं. मी देखील ओबीसीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला नाही. राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही त्या त्या पक्षाचा तो प्रश्न असतो असं यावेळी भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्षांमधील उमेदवार एकमेकांविरोधात लढले. बुलढाण्यात मनोज कायंदे आमच्या पक्षातर्फे लढला तिथे शिंदे नावाचा आमचाच माणूस पवार गटाकडून लढला. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पार्टीचा आणखी एक उभा राहिला होता. त्याने स्वतंत्र लढायला पाहिजे होते. अर्थात तिथे मला बोलवण्यात आलं आम्ही गेलो. लोक चांगले होते आणि मनोज कायंदे निवडून आला असं भुजबळ म्हणाले.

Chhagan bhujbal sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : पवार कुटुंबासाठी ओठावर आलंच; छगन भुजबळ प्रयत्न करणार?

राजकाणात टीका करताना खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. पूर्वी सुसंस्कृतपणा जो राजकारणात होता तो आता राहिला नाही असे भुजबळ म्हणाले. 40 वर्षापूर्वी असे नव्हते. एखादा कायदा आला तर सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर सगळे एकत्र बसून चर्चा करत. विरोधी पक्षातील देखील सभागृहात भांडणे करुन नंतर एकत्र चहा घ्यायचे. आता सगळ्यागोष्टी बदलत चालल्या आहेत असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com