Sameer Bhujbal Politics:नगराध्यक्षपदासाठी भाजप अडून बसला, समीर भुजबळ यांनी दिला ‘हा’ पर्याय...महायुती टिकेल की...

Sameer Bhujbal solution to mayor post BJP deadlock: येवला, नांदगाव, मनमाड नगरपालिकेसाठी मंत्री छगन भुजबळ यांची स्वबळाची तयारी, मात्र भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न
Sameer Bhujbal & Girish Mahajan
Sameer Bhujbal & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Sameer Bhujbal News: येवल्यासह नांदगाव आणि मनमाड पालिकेत निवडणुकीची तयारी झाली आहे. निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या विरोधकांना शिंगावर घेण्याचे संकेत दिले. प्रसंगी स्वबळाची तयारी देखील व्यक्त केली.

जिल्ह्यात येवला नांदगाव आणि मनमाड या तीन नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चुरस आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे हे परंपरागत विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीतील संघर्षाची पार्श्वभूमी आहे. येवल्यात भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अडून बसला आहे.

येवला, मनमाड आणि नांदगाव या तिन्ही नगरपालिकेसाठी स्वबळावर निवडणुकीची तयारी झाल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले आहे. स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन मेरिट विचारात घेऊन उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपला सोबत घेण्याची ही त्यांची तयारी आहे.

Sameer Bhujbal & Girish Mahajan
Congress Politics: अस्तित्व शोधणाऱ्या काँग्रेसला दुर्बुद्धी; नेत्यांमध्ये दुफळी, हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेनं कार्यकर्ते नाउमेद!

येवला नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. या संदर्भात भाजपचा नगराध्यक्ष पदाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. ऐवजी नगरसेवकांच्या जागांबाबत चर्चेचे संकेत दिले.

Sameer Bhujbal & Girish Mahajan
BJP political strategy : राष्ट्रवादीच्या वाट्याला जास्त मुस्लिम मतदारसंघ; भाजपचा कुटील डाव झिरवळांनी सांगितला

मनमाड आणि नांदगाव नगराध्यक्ष पदासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील निश्चित करण्यात आला आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना आणि निवडणुकीचे मेरिट लक्षात घेऊन उमेदवारी जाहीर केली जाईल.

या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा कोणत्याही प्रश्न येत नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे.

माझी खासदार समीर भुजबळ यांनी शिवसेना शिंदे पक्षाला थेट आव्हान दिले आहे. हे आव्हान येवल्यात माजी आमदार नरेंद्र दराडे यांना तर मनमाड आणि नांदगाव येथे त्यांचे कट्टर विरोधक आमदार सुहास कांदे यांना आहे. त्यामुळे आगामी महिनाभर या दोन्ही तालुक्यांमध्ये विधानसभेतील भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षाची प्रचिती मतदारांना येईल.

नाशिक जिल्ह्यातील या तिन्ही नगरपालिकांची निवडणूक सर्वाधिक चर्चेत असणार आहे. यामध्ये आमदार सुहास कांदे यांच्याबरोबरच मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. दोन्ही बाजूंकडून निवडणुकीत कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता कार्यकर्ते आणि नेते घेतील.

नगरपालिकेच्या या निवडणुका राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपली रणनीती आणि निवडणूक लढविण्याचे कसाब पणाला लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com