Suhas Kande Politics: भुजबळ कांदे भिडले; आमदार कांदे यांची धमकी "तुझा मर्डर फिक्स"

MLA Nitin Kande murder threat controversy in Nashik : नांदगाव येथे ऊसतोड मजूर आणि मतदारांना दाबून ठेवल्याने माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे आमने-सामने
Suhas Kande & Chhagan Bhujbal
Suhas Kande & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नांदगाव या संवेदनशील मतदारसंघात आज मतदारांची ओळख पटविण्यावरून मोठा राडा झाला. हे मतदार परराज्यातून आणल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांना डांबून ठेवल्याने हाय व्होल्टेज ड्रामा घडला. यावेळी आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार भुजबळ समोरा समोर आल्याने हमरी तुमरी झाली. पोलिसांच्या उपस्थितीतच हे घडले.

नांदगाव मतदार संघात मतदानादरम्यान मोठा वाद घडला. नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्याशी संबंधित संस्थेत काही ऊसतोड कर्मचारी आणि मजुरांना ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीमुळे माजी खासदार भुजबळ समर्थकांसह तेथे पोहोचले. त्यांनी त्या मजुराची ओळख पटविल्याशिवाय त्यांना बाहेर पडू देऊ नका, अशी मागणी केली.

Suhas Kande & Chhagan Bhujbal
Cash for Vote : पैशांचे घबाड सापडले तेथे हॉटेल रूमवरील मंत्रालयातील "ती" अधिकारी कोण? उमेदवाराशी काय संबंध ?

यावरून दोन्ही उमेदवारांत मोठा वाद निर्माण झाला. यावेळी आमदार कांदे यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच उपस्थितांना धमकावले. माजी खासदार समीर भुजबळ यांना त्यांनी थेट जिवे मारण्याची धमकी दिली "तुझा मर्डर फिक्स आहे" असे त्यांनी खासदार भुजबळ यांना जमावाच्या उपस्थितीत धमकावले.

Suhas Kande & Chhagan Bhujbal
Maharashtra Election Voter Turnout: पालकमंत्री दादा भुसे, मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात मतदान संथ

आमदार कांदे यांना देखील माजी खासदार भुजबळ यांनीही त्याच त्वेषाने उत्तर दिले, "अरे जा रे, तुझ्यासारखे छप्पन बघितलेत" असे त्यांनी सुनावले. या वादाने वातावरण एकदम तापले. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची ही मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार कांदे यांना काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही.

या दोन्ही उमेदवारांत चांगलीच जुंपली. प्रकरण अतिशय गंभीर बनल्याने पोलीस अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. त्यानंतर संबंधित मतदारांना बाहेर सोडण्यात आल्याने माजी खासदार भुजबळ यांनी त्याला विरोध केला. या गाड्यांना सोडू नका असा त्यांचा आग्रह होता. गोड्या सोडल्यास त्या गाड्यांपुढे झोपेन असे त्यांनी सुनावले.

मतदारांची ओळख पटविण्यावरून या वादाला सुरुवात झाली होती. पोलीस पथक वेळीच दाखल झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही तातडीने संबंधितांना सूचना केल्या.

आमदार कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग झाला. उमेदवारांना संशय आला असल्यास त्यांनी मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांना ओळखपत्र तपासून खात्रीपटविण्याच्या सूचना देणे आवश्यक होते. त्यात आमदार कांदे यांनी हस्तक्षेप केल्याची तक्रार आली. त्यामुळे सबंध मतदार संघात वाद झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे काही वेळ मतदानातही बाधा आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com