Yogi Adityanath : सनातन धर्माच्या श्रद्धेशी छेडछाड सहन करणार नाही; योगी आदित्यनाथ यांचा इशारा

Jalgaon Godri Kumbh News : जळगावातील गोद्री येथे आयोजित कुंभ मेळाव्याला दिली भेट
Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : सनातन धर्माचा अर्थ भाव धर्म होय, या धर्मात जन्म घेणे गौरव आहे,धर्मांतराच्या माध्यमातून जर कुणी धर्माशी छेडछाड करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे आयोजित कुंभ मेळाव्यात ते बोलत होते.

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना नायकवडा समाज मेळावा गेल्या पाच दिवसापासून गोद्री येथे सुरू होता. त्याचा आज समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित होते.

यावेळी योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba), जगद्गुरू शंकराचार्य सदानंद महाराज, बाबुसिंग महाराज, वृंदावन धामचे गादीपती गोपलजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील, जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आदी उपस्थित होते.

Yogi Adityanath
Kasaba By-Election: कसबा पेठेत आता मिसळपावचीच चर्चा; महाविकास आघाडीत ठिणगी?

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "सनातन धर्मावर गर्व असला पाहिजे. या धर्मसोबत छेडछाड करणे म्हणजे मानवता सोबत छेड करणे. धर्मांतराच्या माध्यमातून तो प्रयत्न केला जात असून तो यशस्वी होऊ देणार नाही."

Yogi Adityanath
Narendra Patil On Shinde : सरकारला ७ महिने झाले अन॒ मुख्यमंत्री शिंदेंवर पाहिला हल्लाबोल भाजप उपाध्यक्षानेच केला...

उत्तर प्रदेशातील कायद्याबाबत ते म्हणाले, "सनातन धर्म सर्वांच्या सुरक्षेचे कवच आहे. देश सुरक्षित तर सर्व सुरक्षित होय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) धर्मांतर होत नाही, केले तर त्याला दहा वर्षांची शिक्षा आहे. उत्तर प्रदेशात दंगेही बंद झाले आहेत."

Yogi Adityanath
Pankaja Munde News : भाजपच्या जवळ आलेल्या क्षीरसागरांना मुंडेंचा नमस्कार `स्वागता`चा कि `रामराम`चा..

यावेळी अदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोद्री येथील कुंभ मेळावा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, "कुंभचा भाव म्हणजे सर्व प्रकारचे कामना आणि सिद्धीपूर्ती होय. बंजारा समाजाने हा कुंभ राष्ट्रीय स्तरावर न्यावा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com