Kasaba By-Election : पुणे (Pune) म्हटलं की सर्वपक्षीय नेत्यांचे काही ठरावीक कट्टे प्रसिद्ध आहेत. तेथे होणाऱ्या चर्चा, निवडणुकांबाबत व्यक्त केलेले आंदज, लावलेली पैंज आदी राज्यात प्रसिद्ध आहेत.कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवडच्या पोट निवडनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय कट्टे गजबजू लागले आहेत. त्यातच कसबा पेठेत झालेल्या मिसळ पावच्या पार्टीची चर्चा सुरू झालेली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभेच्या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं या दोन्ही मतदार संघात सर्व पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं सध्या चित्रं दिसून येतंय. या दोन्ही मतदार संघतून अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवार जाहीर करण्यात आली नाही. असं असलं तरी अनेक इच्छूकांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. यात हळदी-कुंकू, जेवणावळी मेजवानीचे आयोजन केलं जात आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोट निवडणुकीसाठी महविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (congress) आणि शिवसेना या तीनही पक्षांचे अनेक इच्छूक आहे. तसेच ते इच्छूक आपण निवडणुकीसाठी तयार असून आता फक्त पक्षाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचं सांगतात. असं असतानाही काही इच्छूक जाहीरपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसून येत आहेत.
कसबा पेठ पोट निवडणूक (By-Election) महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लढणार हे अद्याप ठरविलेलं नाही. पक्ष ठरल्यानंतर त्यानंतर उमेदवार ठरणार आहे. दरम्यान कसबा पेठ (Kasaba by-election) मधून काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) इच्छूक आहेत.
त्यांनी आज महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांसह समर्थक आणि कार्यकर्त्यांना मिसळ पाव (Misal pav) व उसळ पावची मेजवानी दिलीय. यामुळे कसबा पेठ निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळंच या मिसळ पावच्या (Misal pav) मेजवानीचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.
याबाबत दाभेकर म्हणाले, "महाविकास आघाडीतील अनेक नेते मला भेटले. त्यानंतर आमची बैठक झाली. त्या बैठकीत ठरलं की मी उमेदवार असेल तर पूर्ण पाठिंबा देऊन मदत करू. मी काँग्रसचा १९७६ पासून सभासद आहे. जुना कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसकडे अपेक्षा व्यक्त केलीय. आघाडीत सर्व पक्षांचे नेते माझ्या मागे आहेत. ते मला मदत करणार आहेत."
बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) हे १९७६ पासून काँग्रेस (Congress) सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यावेळीही ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांच्या रांगेत आहेत. आता महाविकास आघाडीतून ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांना मेजवाणीचा आनंद मिळत असल्याचं चित्र पुण्यात दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.